शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार केबलचालक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:44 IST

उपग्रहाद्वारे मनोरंजनाचे कार्यक्रम केबलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविणाऱ्या व्यवसायात आता रिलायन्स कंपनीने उडी घेतल्यामुळे स्थानिक केबलचालकांचे धाबे दणाणले असून, मुंबई, ठाणे, पुण्याप्रमाणे नाशकातही रिलायन्सला विरोध दर्शविण्यासाठी सर्वपक्षीय नेते तसेच केबलचालकांनी एकत्र येऊन रिलायन्सला बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देरिलायन्सची उडी : केबलचालकांकडून बंदी घालण्याची मागणी

नाशिक : उपग्रहाद्वारे मनोरंजनाचे कार्यक्रम केबलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविणाऱ्या व्यवसायात आता रिलायन्स कंपनीने उडी घेतल्यामुळे स्थानिक केबलचालकांचे धाबे दणाणले असून, मुंबई, ठाणे, पुण्याप्रमाणे नाशकातही रिलायन्सला विरोध दर्शविण्यासाठी सर्वपक्षीय नेते तसेच केबलचालकांनी एकत्र येऊन रिलायन्सला बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.नाशिक जिल्ह्णात लाखो केबल ग्राहक असून, त्यांच्यासाठी हाथवे, डेन, इन आदी कंपन्यांच्या माध्यमातून केबलचालकांनी घरोघरी जोडणी दिली आहे. दरमहा ग्राहकांकडून केबलचे पैसे गोळा करून त्यातील काही रक्कम सरकार जमा केली जात आहे. जिल्ह्णात जवळपास पाच हजारांहून अधिक कर्मचारी या व्यवसायावर उदरनिर्वाह करीत असताना आता रिलायन्स कंपनीने या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना केबल सेवा देण्याचे ठरविले आहे. रिलायन्सच्या आगमनामुळे अन्य खासगी कंपन्या धोक्यात येऊन त्यांचे केबलचालक व आॅपरेटर यांना व्यवसाय बंद करावा लागणार आहे. मुंबई, ठाण्यातील केबलचालक या विषयावर एकत्र आले असून, त्याचे पडसाद नाशकातही उमटले आहेत. या व्यवसायातील केबलचालक रिलायन्समुळे बेरोजगार होण्याची भीती व्यक्त करीत आहे. शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेसने रिलायन्स कंपनीला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत या संदर्भात शनिवारी केबलचालकांचा मेळावा होत असून, त्यात या संदर्भातील अधिकृत भूमिका ठरणार आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन