पिंपळगाव वाखारी : परिसरात गेल्या पंधरवड्यात डेंग्यूचे पाच संशयित रुग्ण आढळून आले असून, ताप, सर्दी, खोकला आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाची उदासीनता व सुस्त कारभार यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तापाच्या आजारामुळे काही मुलांसह मोठ्या लोकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यातील पाच-सहा जणांच्या रक्तनमुन्यात डेंग्यूचे विषाणू आढळून आल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाच्या मते ते संशयित रुग्ण आहेत. शिवाय इतर काही रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला आदि लक्षणे दिसून येत असल्याने ताप आल्यास रुग्णांमध्ये घबराट निर्माण होते. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने कीटकनाशकांची फवारणी केली असली तरी डासांच्या उत्पत्तीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. (वार्ताहर)
पिंंपळगाव वाखारी परिसरात डेंग्यूचे पाच संशयित रुग्ण
By admin | Updated: August 30, 2015 23:40 IST