शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात एकाच दिवसात पाच रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:57 IST

सिन्नर तालुक्यात शुक्रवारी रात्री आणखी पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील रुग्णसंख्या ३० झाली आहे. आतापर्यंत नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्दे१२ कंटेन्मेंट झोन । रुग्णसंख्या पोहचली ३० वर

सिन्नर : तालुक्यात शुक्रवारी रात्री आणखी पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील रुग्णसंख्या ३० झाली आहे. आतापर्यंत नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तालुक्यतील दापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह निघाले. दापूर येथील नागरिकांना मुंबई येथून आणणारा गुळवंच येथील टॅक्सीचालक शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर दापूर येथील रुग्णाच्या संपर्कातील ९०वर्षीय वृद्धही कोरोना पॉझिटिव्ह आला. गेल्या तीन दिवसांपूर्वी मुंबई येथून फुलेनगर (माळवाडी) येथे आलेला ५४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील ३७ व ३९ वर्षीय महिला व २२ वर्षीय युवकही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या ३० झाली आहे.आतापर्यंत नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, २१ जणांवर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली. नाशिक येथून पाच तर सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून चार रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तालुक्यात २२ कंटेन्मेंट झोन आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य