शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात दिल्लीतून पाच जणांची एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 23:27 IST

सटाणा : शहरात गुरु वारी (दि.२) रात्री अचानक दिल्लीहून पाच जण आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्याच्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असताना ते पाच जण आलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना चौदा दिवस रुग्णालयात ठेवावे अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

ठळक मुद्देशहरात खळबळ : सीमाबंदीचे उल्लंघन केल्याने कारवाईची मागणी

सटाणा : शहरात गुरु वारी (दि.२) रात्री अचानक दिल्लीहून पाच जण आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्याच्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असताना ते पाच जण आलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना चौदा दिवस रुग्णालयात ठेवावे अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.शहरातील एका भागात गुरु वारी रात्री अचानक दिल्लीहून पाच जण आले. त्यांच्या नातेवाइकांकडे आलेल्या या पाच जणांनी घरात थांबण्याऐवजी ते बाहेर फिरताना आढळले. लॉकडाउन काळात घरात राहणे बंधनकारक असताना राजरोस बाहेर फिरत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सटाणा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले. मात्र डॉ.नायानी यांनी त्यांची तपासणी करून तसे कोणतेही लक्षणे नसल्याचे सांगून सोडून दिले.हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी दिल्लीहून आलेल्या पाच जणांना चौदा दिवस रुग्णालयातच ठेवावे अशी मागणी केली. मात्र पोलिसांनी त्याला नकार देत त्यांना कोणी त्रास दिल्यास त्यांच्यावरच गुन्हे दाखल करू, असा सज्जड दमच दिला. यामुळे येथील नागरिक दहशतीखाली आहेत.कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून, या भयंकर आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच दिल्लीत एका कार्यक्रमात संशयित मोठ्या प्रमाणावर सापडल्यामुळे अधिकच भीतीचे वातावरण पसरले असताना गुरु वारी (दि. २) रात्री ते पाच जण अचानक दिल्लीहून शहरातील एका भागात अवतरल्याने त्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आहे. ते पाच जण रात्री फिरत असल्याने स्थानिक नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली असून, त्यांनी रात्र अक्षरश: जागून काढली.देशभर लॉकडाउन केल्यामुळे सरकारने राज्या-राज्यातील, जिल्ह्या-जिल्ह्यातील सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हे कठोर पाऊल उचलले असताना ग्रामीण भागातदेखील गावागावात प्रवेशाला बंदी घालत एक पाऊल पुढे टाकले. सर्वत्र लॉकडाउनचे काटेकोर पालन केले जात असताना सटाण्यात दिल्लीचे लोक आलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस