शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भगूर-लहवित रस्त्याचे सव्वा कोटी ‘पाण्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:13 IST

येथील स्वामी समर्थ मंदिर ते सावन विलापर्यंत नुकताच सव्वा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भगूर-लहवित रस्त्याचे काँक्रिटीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तो वाहतुकीस अयोग्य ठरला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

भगूर : येथील स्वामी समर्थ मंदिर ते सावन विलापर्यंत नुकताच सव्वा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भगूर-लहवित रस्त्याचे काँक्रिटीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तो वाहतुकीस अयोग्य ठरला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.  भगूरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता अनेक वर्षे न्यायालयीन वादात अडकला होता नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर भगूर नगरपालिकेने रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी घाईघाईने निर्णय घेऊन तांत्रिक सपाटीकरण न चुकीच्या पद्धतीने करून, साधारण एक कोटी ३५ रुपये खर्च करण्यात आले. रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइप न टाकता कथडा बांधल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते रस्त्यावरच साचत आहे. वाहकधारकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असून, रविवारच्या किरकोळ पावसाने या रस्त्यावर पाणी साचले, पावसाळ्यात तर रस्त्यावर हौदासारखी परिस्थिती होईल, असे बोलले जात आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने अपघाताची भितीही व्यक्त केली जात आहे. इगतपुरीला जोडणाऱ्या या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याकरिता भगूर पालिकेने दखल घेऊन या रस्त्याची फेरदुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत विरोधी पक्षाचे नगरसेवक तथा भगूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोहन भिकाजी करंजकर यांनी सांगितले की, भगूर नगरपालिकेने रस्त्याची परिस्थिती न पाहता, अतांत्रिक पद्धतीने तो बांधला तसेच रस्त्याला कथडा केल्यामुळे पाणी साचते.न्यायालयात दावाभगूरचे माजी नगराध्यक्ष पां. भा. करंजकर याच्या मालकीची जागा या रस्त्यात जात असून, त्याचा मोबदला मिळावा म्हणून करंजकर यांनी न्यायालयात दावा दाखल करून पालिकेकडे पैशाची मागणी केली आहे. त्यामुळेच नगरपालिकेने घाईघाईने रस्ता तयार केल्यामुळे तो चुकीचा झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक