शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

कोरोनाच्या धसक्याने विमा घेण्याच्या प्रमाणात पाच पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 01:10 IST

नाशिक : मार्च महिन्यापासून सातत्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सवर्सामान्य नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. या भीतीवर तोडगा म्हणून अनेक नागरिकांनी आपला मेडिक्लेम तसेच आयुविर्मा वाढवून घेतले आहेत. किंवा ज्यांच्याकडे यापूर्वी हे दोन्ही विमा नव्हते, त्यांनी नवीन विमा मिळवत स्वत:साठी सुरक्षेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोरोना वाढीच्या प्रमाणात चौपट ते पाच पटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा विमा काढता येऊ शकतो.

नाशिक : मार्च महिन्यापासून सातत्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सवर्सामान्य नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. या भीतीवर तोडगा म्हणून अनेक नागरिकांनी आपला मेडिक्लेम तसेच आयुविर्मा वाढवून घेतले आहेत. किंवा ज्यांच्याकडे यापूर्वी हे दोन्ही विमा नव्हते, त्यांनी नवीन विमा मिळवत स्वत:साठी सुरक्षेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोरोना वाढीच्या प्रमाणात चौपट ते पाच पटीने वाढ झाली आहे.कोरोनाची लागण झाल्यानंतर अचानक संकट नको म्हणून नागरिकांनी त्यांच्या परीने काहीशा कमी खर्चाचा विमा काढण्याला प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या निमित्ताने विमा काढण्याबाबत नागरिक अधिक सजग झाले असल्याचा कल आयुविर्मा महामंडळ युनायटेड इन्शुरन्स आणि अन्य सर्व खाजगी कंपन्यांमध्ये देखील दिसून येत आहे. वर्षाच्या प्रारंभापासून जगभरात कोरोनाच्या किरकोळ बातम्या येत असल्या तरी नाशिकला साधारणपणे मार्च महिन्यापासून त्याबाबत अधिक प्रमाणात चर्चेला जोर आला होता. मार्च अखेर आणि एप्रिलमध्ये काही नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मात्र हा वेग मोठ्या प्रमाणात वाढला. मेपर्यंत कोरोनाचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच ऐन पावसाळ्यात धोरणाने धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला. त्यामुळे मी महिन्याच्या अखेरीस तसेच त्यानंतरच्या तीन महिन्यात कोरोनापासून सुरक्षितता मिळवण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या उपाययोजनांना नागरिकांनी प्राथमिकता दिली. त्यात स्वच्छता, मास्क आणि आहारात केलेल्या बदलाबरोबरच आवश्यकता भासल्यास कमी पडू नये म्हणून मेडिक्लेमचा देखील अवलंब केला. ज्यांच्याकडे कोणत्या कंपनीचा मेडिक्लेम नव्हता त्यांनी त्यातल्या त्यात कमी दराचे असणारे कंपन्यांचे मेडिक्लेम स्वीकारण्याचा पवित्रा घेतला. तर समजा काही बरेवाईट झाले तर निदान आपल्या कुटुंबाला त्याचा फटका बसू नये, या उद्देशाने अनेक नागरिकांनी आयुविर्मादेखील काढण्याला प्राधान्य दिले. ज्यांच्याकडे हे दोन्ही विमा होते , त्यांनी त्याच्या रकमेत वाढ करण्याचा किंवा नवीन अजून एक विमा स्वीकारत आपल्या भविष्यातील सुरक्षिततेचा मार्ग अवलंबला. त्यासाठी अनेक नागरिकांनी कोविड विम्याचा पर्याय स्वीकारत खबरदारी घेतली. कोविडचा विमा हा नऊ महिन्यांसाठी असल्याने त्याचा दर काहीसा कमी आहे. सर्व आजार कव्हर करणा?्या अन्य पॉलिसीतही या आजारावर उपचार शक्य आहेत. मात्र नागरिक कोरोनाच्या प्रभावामुळे आधीच भयभीत झालेले आहेत, त्यामुळे कोरोना विमा घेण्याला त्यांच्याकडून प्राधान्य दिले जात आहे. या विम्याचा मंजुरीचा कालावधी पंधरा दिवसांचा आहे. तसेच कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा विमा काढता येऊ शकतो. नाशिक शहरात तसेच जिल्ह्यात या आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण पाच पटीने तर आयुविर्मा काढण्याच्या प्रमाणात तिप्पटीने वाढ झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य