शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांनी गुन्हा दाखल

By admin | Updated: March 7, 2017 00:32 IST

चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील ‘त्या’ तोतया डॉक्टरविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात तब्बल पाच दिवसांनंतर फिर्याद दाखल झाली.

चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील ‘त्या’ तोतया डॉक्टरविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात तब्बल पाच दिवसांनंतर फिर्याद दाखल झाली. उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. १) वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून केसपेपरवर औषधे लिहून देणाऱ्या सीतारामनामक तोतया डॉक्टराविरोधात आरडाओरड झाल्यानंतरही गुन्हा दाखल झाला नाही. अखेर आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने तर्क-वितर्क व्यक्त होत आहे. दि. १ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास डॉ. अभिजित नाईक रुग्णालयात आलेले नसताना एक रुग्ण इंजेक्शन घेण्यासाठी अधिपरिचारिका कल्पना गावित यांच्याकडे गेला असता, त्यांना केसपेपरवरील अक्षराबाबत शंका आल्याने त्यांनी बाह्यरुग्ण विभागात जाऊन पाहिले तर डॉ. नाईक यांच्या खुर्चीत अनोळखी व्यक्ती रुग्णांची तपासणी करून केसपेपरवर औषधे लिहून देत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत गावित यांनी सदर व्यक्तीस विचारणा केली असता, डॉ. नाईक यांनी ते येईपर्यंत रुग्ण तपासणीसाठी मला पाठविले आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर सदर घटनेची माहिती अधिपरिचारिका गावित यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे यांना दिली. या कालावधीत रुग्णालयात गर्दी झाल्याने गर्दीचा फायदा घेऊन तो तोतया सीताराम फरार झाला, तर सीतारामनामक व्यक्ती भरवीर, ता. चांदवड येथील असल्याचे समजले. याबाबत कल्पना गावित यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते करीत आहेत. मात्र या उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून उपजिल्हा रुग्णालयातील कारभार भोंगळ असल्याचा अनुभव आला. जागरूक नागरिकांनी सदरचा प्रकार उघडकीस आणला व प्रशासन साधी गुन्हा दाखल करण्यासाठी सुमारे पाच दिवसाचा वेळ खातो यावरून तोतया डॉ. सीतारामला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वरदहस्तच असल्याचे अनेकांनी यापूर्वी बोलून दाखविले आहे. (वार्ताहर)