शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कळवणमध्ये पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:56 PM

कळवण : शहर व तालुक्यात कोरोना रु ग्णाच्या आकड्याने शंभरी पार केली असून कळवण व अभोणा शहरात कोरोनाबाधिताची संख्या व दररोज रुग्ण आढळून येत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कळवण शहरात दि १६ ते २० सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

कळवण : शहर व तालुक्यात कोरोना रु ग्णाच्या आकड्याने शंभरी पार केली असून कळवण व अभोणा शहरात कोरोनाबाधिताची संख्या व दररोज रुग्ण आढळून येत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कळवण शहरात दि १६ ते २० सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात याच तारखेदरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता.आमदार नितीन पवार यांच्या सूचनेनुसार कळवण व्यापारी महासंघाने याबाबत पुढाकार घेऊन अत्यावश्यक सेवा वगळता सर्वं व्यवसाय, व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी महासंघ बैठकीत घेण्यात आला. कळवण व्यापारी महासंघ, सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरपंचायत पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी एकत्र बैठक घेऊन जनता कर्फ्यूबाबत चर्चा करु न सर्वानुमते निर्णय घ्यावा, अशी सूचना आमदार नितीन पवार यांनी सोमवारच्या शासकीय अधिकारी व व्यापारी बांधव यांच्या बैठकीत केली होती.त्यानुसार हरी ओम लॉन्स बैठकीत जनता कर्फ्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आला. कळवण शहरातील नागरिक वा व्यापारी बांधवानी प्रशासनाला सहकार्य करु न दिशा निर्देशाचे पालन करु न जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले आहे.जनता कर्फ्यू बैठकीत नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले नाहीतर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. जेष्ठ नेते रविंद्र देवरे, नंदकुमार खैरनार, राजेंद्र भामरे, मोहनलाल संचेती,नगरसेवक अतुल पगार विलास शिरोरे, दीपक महाजन, गंगाधर गुंजाळ, विजय जाधव, महेश महाजन यांनी जनता कर्फ्यू संदर्भात आपली भूमिका मांडली.बैठकीला नगराध्यक्षा रोहिणी महाले, जितेंद्र पगार, निंबा पगार, दशरथ बच्छाव, प्रकाश संचेती, जितेंद्र कापडणे, नगरसेवक बाळासाहेब जाधव, नगरसेविका सुरेखा जगताप नितीन वालखडे , कुमार रायते , संदीप पगार, विनोद मालपुरे सागर खैरनार उमेश सोनवणे, सागर वाणी, मुन्ना काकुळते, स्वप्नील शिरोरे, भूषण शिरोरे शांताराम जाधव आदी उपस्थित होते.दि 16ते 20 सप्टेंबर पर्यंत मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल व हॉस्पिटल वगळून बाकी सर्व सेवा बंद राहणार असून, शहरिहतासाठी शहरवासीयांनी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन आमदार नितीन पवार व सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, व्यापारी महासंघ यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल