शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाख लोकांनी घरपोच केली दारू खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:31 IST

परराज्यातून मद्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक2 उपाय योजना राबविण्यात आल्या तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात 24 मार्च ते 28 मे दरम्यानच्या काळात राज्यात 6666 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 3089 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे राज्यात 6666 गुन्हे दाखल करण्यात आले

नाशिक :  कोरोनाचा वाढलेला प्रसार पाहता राज्य सरकारने मुंबई सह चार जिल्ह्यात दारू विक्रीस अनुमती न देता त्यांना ऑनलाईन घरपोच दारू खरेदीची मुभा दिल्याने गेल्या पंधरा दिवसात या चार जिल्ह्यात साडेपाच लाख लोकांनी घरपोच दारू खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने या संदर्भात माहिती राज्य सरकार ला दिली आहे. कोरोनामुळे राज्यातील मद्य विक्रीचे दुकाने गेली दीड महिने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळेच राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला, राज्य अगोदरच आर्थिक संकटात असताना त्यात उत्पनात कमतरता जाणवू लागल्याने सरकारने 3 मे पासून काही प्रमाणात मद्य विक्रीस अनुमती दिली, मात्र त्यातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोलापूर व औरंगाबाद या चार जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 10791 मद्य विक्रीच्या परवाने पैकी 7291 परवाने सध्या सुरू आहेत. मुंबई सारख्या मोठ्या शहरात मद्य विक्री बंद ठेवल्याने त्याचा इतर व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने चार जिल्ह्यात घरपोच मद्यविक्री योजना सुरू केली आहे. या योजनेत 15 मे पासून आजतागायत 5 लाख, 52 हजार 637 ग्राहकांनी लाभ घेतला असून 29 मे रोजी एकाच दिवसात 58,231 ग्राहकांनी मद्य खरेदी केली आहे. त्यापैकी एकट्या मुंबई शहर व मुबंई उपनगर येथील 35,513 ग्राहकांचा समावेश आहे. सरकारने परवाना धारकांना मद्य विक्री करण्याची सक्ती केली असल्यामुळे 1 ते 28 मे दरम्यान राज्यात एक लाख, 2,712 इतक्या व्यक्तींना परवाने मंजूर करण्यात आले आहेत. लॉक डावूनच्या काळात पर राज्यातून मद्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक2 उपाय योजना राबविण्यात आल्या तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात 24 मार्च ते 28 मे दरम्यानच्या काळात राज्यात 6666 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 3089 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस