शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीच वेळ : शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम

By admin | Updated: August 7, 2016 00:31 IST

सर्व धरणांतून विसर्ग

नाशिक : पावसाने जिल्ह्यात शनिवारी हजेरी कायम ठेवल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच २३ धरणांपैकी १९ धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपावेतो ३५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ वाजेपावेतो ५६९ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ३७ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने तो खरा ठरत रात्रीपासून सुरू झालेला पाऊस दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. परिणामी सूर्यदर्शनदेखील होऊ शकले नाही. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक शाळांनी पावसाचा जोर पाहून सुटी जाहीर करून टाकली. पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहून सकाळी १० वाजेनंतर गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. दहा वाजता १२,७०८ क्यूसेक असलेले पाणी व त्यात धरणाच्या खालच्या बाजूने गोदावरीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांमुळे हाच विसर्ग रामकुंडाजवळ १४,१९० क्यूसेकपर्यंत पोहोचल्याने पुन्हा गोदावरीच्या पुराची पातळी वाढली. टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्गात वाढ करण्यात आल्यानंतर दुपारी रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीही पूर्णपणे पाण्यात बुडाला. परंतु मंगळवारच्या पुरामुळे अगोदरच सावध असलेल्या गोदाकाठच्या नागरिकांचे शनिवारच्या पुरात नुकसान टळले.धरणांचे दरवाजे उघडलेयंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे सर्वच धरणांच्या साठ्यांमध्ये वाढ झाली आहे. अपवाद गिरणा धरणाचा असून, ते ३५ टक्केच भरले आहे. २३ लहान-मोठ्या धरणांमध्ये ६६ टक्के साठा झाला आहे. शनिवारी गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर, चणकापूर, पूनद, हरणबारी, केळझर, ठेंगोडा या १९ धरणांमधून नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. दशकात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्वच धरणांमधून एकाच वेळी पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांनी सांगितले.