शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

भोजापूरच्या पूरपाण्याने पहिल्यांदाच भरले बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:00 IST

सिन्नर/पांगरी : गेल्या दहा वर्षांपासून पाण्याची तहान लागून राहिलेले सिन्नर तालुक्यातील अवर्षणग्रस्त पांगरी येथील दोन बंधारे भोजापूरच्या पूरपाण्याने पहिल्यांदाच ओसंडून वाहू लागल्याने पांगरीकरांनी आनंदोत्सव साजरा केला.

सिन्नर/पांगरी : गेल्या दहा वर्षांपासून पाण्याची तहान लागून राहिलेले सिन्नर तालुक्यातील अवर्षणग्रस्त पांगरी येथील दोन बंधारे भोजापूरच्या पूरपाण्याने पहिल्यांदाच ओसंडून वाहू लागल्याने पांगरीकरांनी आनंदोत्सव साजरा केला. आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करीत पांगरीकरांनी कृतज्ञता व्यक्त केली.जिल्ह्यात व तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस होत असताना पांगरी व वावी परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने बंधारे कोरडेठाक असल्याने विहिरींच्या जलपातळीत कोणतीही वाढ झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर पांगरी, दुशिंगपूर व फुलेनगर येथील बंधाºयांत भोजापूर धरणाचे पूरपाणी सोडण्याची मागणी केली जात होती.आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता एस. एस. गोंदकर, एस. डब्ल्यू. बोडके यांनी अवर्षणग्रस्त पूर्व भागात भोजापूरचे पूरपाणी आणण्यासाठी गेल्या महिनाभरापासून प्रयत्न सुरू ठेवले होते. भोजापूरच्या पूरचाºयांची अवस्था अतिशय वाईट होती. शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता आमदार राजाभाऊ वाजे यांनी स्वत: पदरमोड करीत डिझेल व जेसीबी पाठवून चाºया खोदून त्यातील अडथळे दूर केले होते. पांगरी येथील शेतकरी व युवकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून चारीवर जाऊन राखण करीत पाणी आणण्यासाठी मेहनत घेतली होती. त्यामुळे भोजापूरच्या पूरपाण्याने पहिल्यांदाच पांगरी शिवारात दोन बंधारे भरून ओसंडून वाहू लागल्याचे चित्र होते.दोन दिवसांपूर्वी पांगरी शिवारात पूरपाणी पोहचले. या पाण्याने मºहळ रस्त्यावरील व संत हरिबाबा मंदिराजवळील दोन्ही मोठे बंधारे भरले. बंधारे ओसंडून वाहू लागल्यानंतर पांगरीकरांनी रविवारी सकाळी जलपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमदार वाजे, उदय सांगळे व पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून कोरडेठाक असणारे बंधारे समाधानकारक पाऊस नसतानाही भोजापूरच्या पूरपाण्याने भरल्याने पांगरीकरांनी रांगोळ्या काढून व फटाके फोडून स्वागत केले.भोजापूरचे पूरपाणी आणल्याबद्दल आमदार वाजे यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यातच आला. यावेळी ज्ञानेश्वर पांगारकर, संपत पगार, भास्कर निकम, रावसाहेब आढाव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे, नगरसेवक विजय जाधव, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, सुनील पगार, संतोष पगार, सुनील निरगुडे, शिवाजी कांडेकर, दीपक वेलजाळी, सुनील काटे, चंद्रकांत वेलजाळी, नंदलाल मालपाणी, दत्तात्रय वेलजाळी, अनंत मालपाणी , अ‍ॅड. शरद चतुर यांच्यासह पांगरी व परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पांगरी येथील बंधारे भोजापूरच्या पूरपाण्याने पहिल्यांदाच भरल्यानंतर त्याचे जलपूजन करताना आमदार राजाभाऊ वाजे. समवेत उदय सांगळे, किरण डगळे, जगन्नाथ भाबड, नीलेश केदार, सुमन बर्डे, ज्ञानेश्वर पांगारकर, संपत पगार आदी.५७ दिवसांपासून भोजापूरची पूरचारी सुरूमध्यंतरी ओव्हरफ्लो बंद झाल्यानंतरही पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी सहकार्य केले होते. त्यानंतर पुन्हा निसर्गाने साथ दिल्याने भोजापूर धरणातील पूरचारी सलग ५७ दिवसांपासून सुरू राहिली. पांगरीच्या शेतकºयांनी साथ देऊन मेहनत केल्यानेच भोजापूरचे पूरपाणी पांगरीपर्यंत पोहचणे शक्य झाल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. पूरपाणी पोहचण्यासाठी आपण केवळ प्रामाणिक प्रयत्न केल्याचे आमदार वाजे यांनी सांगितले. ग्रामस्थांनी राजकारण न करता काम करावे, सर्वांना फायदा होईल, असे ते म्हणाले. पाणी आणण्याचे श्रेय मला नको. मी पाणी आणणारा भगीरथ नाही तर केवळ साधन असल्याचे त्यांनी सांगितले. हे टीमवर्क असून, शेतकºयांच्या परिश्रमाचे फळ असल्याचे त्यांनी सांगितले. भोजापूरचे पाणी आणले म्हणून मते द्या असेही मी म्हणणार नसल्याचे वाजे यांनी स्पष्ट केले.