शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

नाशिकरोडच्या ‘माया’ला प्रथम पारितोषिक

By admin | Updated: April 1, 2017 00:55 IST

नाशिकरोड : मारवाड जातीच्या घोड्यांच्या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये नाशिकरोड येथील राहुल बोराडे यांच्या माया नामक घोडीला ‘टू टीथफिली’ या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

नाशिकरोड : इंडिजिनिअस हॉर्स ओनर्स असोसिएशनच्या वतीने सोमाटणे येथे जोपिलोपी स्टड फार्म येथे आयोजित मारवाड जातीच्या घोड्यांच्या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये नाशिकरोड येथील राहुल बोराडे यांच्या माया नामक घोडीला ‘टू टीथफिली’ या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  पुण्याजवळील तळेगाव येथील सोमाटणे येथे इंडिजिनिअस हॉर्स ओनर्स असोसिएशनच्या वतीने नुकतेच तीनदिवसीय मारवाड जातीच्या घोड्यांचे प्रदर्शन व स्पर्धा भरविण्यात आली होती.  या स्पर्धेचे उद्घाटन सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाचे संस्थापक सदस्य जसपालसिंह रावल यांच्या हस्ते झाले. मारवाडच्या भूमितील मूळ प्रजातीचे लोप पावलेले वैभव अश्वांना पुन्हा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या मारवाड जातीच्या घोड्यांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हिमाचल, आसाम, उत्तर प्रदेश आदिंसह इतर राज्यांतील अश्वमालक आपल्या अश्वांसह सहभागी झाले होते.  विविध प्रकारांत व गटात भरविण्यात आलेल्या या स्पर्धेतील ‘टू टीथफिली’ या गटात नाशिकरोड येथील आरटीबी स्टड फार्मचे राहुल तुकाराम बोराडे यांच्या मारवाड जातीच्या माया नामक घोडीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. इंडिजिनिअस हॉर्स ओनर्स असोसिएशनचे सचिव अजय नेन्सी यांच्या हस्ते मायाचे मालक राहुल बोराडे यांना प्रथम क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. (प्रतिनिधी)क्रीडाक्षेत्र, नवी पिढी घडविण्यासाठी स्पर्धारचनेतील दर्जा व प्रत्येक घोड्याची हालचाल याच्या परीक्षणाच्या गुणावरून अश्व भविष्यात क्रीडा क्षेत्रात योग्य असतील की त्यांची नवी पिढी घडविण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल, हे ठरते. व्यावसायिक व ब्रिडर्ससाठी या स्पर्धेमुळे घोड्याचे खूर व इतर वैशिष्ट्यांवरून त्याची योग्यता तपासण्याची संधी उपलब्ध होते.  मारवाड घोड्यांचे लुप्त झालेले वैभव परत मिळवून देण्यासाठी व या प्रजातींना पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात आला होता.