ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29 - कश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणा-या दगड फेकीच्या घटना व त्यामुळे उफाळून येणा-या हिसांचारात राष्ट्रविरोधी शक्तींचा हात आहे. त्यांना भारतीय सैन्याशी गेल्या ६० वर्षात समोरासमोर लढणे शक्य होत नसल्याने अशाप्रकारे कश्मीरी तरुण तरुणींची दिशाभूल करून माथे भडकविण्याचे काम सुरू आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू हिंसाचार थांबविण्यासाठी विशेष रणनिती आखण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण
राज्य मंत्री सुभाष भामरे यानी दिली.
येथील स्वामी नारायण स्कूलमध्ये आयोजित राष्ट्रस्तरीय माजी सैनिक अधिवेशनात ते बोलत. होते यावेळी त्यांनी कुलभूषण जाधव याच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच जाधव रॉ चे एजेंट नसल्याचे स्पष्ट केले.
पाकिस्तानने जाधव यांना कायदेशीर मदत मिळण्यासाठी सहकार्य करावे. त्याशिवाय पाकिस्तान अनुचित पाउल उचलल्यास भारत कदापी सहन करणार नाही असा इशाराही भामरे यानी पाकिस्तानला दिला. तसेच माजी सैनिकांच्या माण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
https://www.dailymotion.com/video/x844wjy