शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी आढळला पहिला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:14 IST

लॉकडाउन सुरू झाल्यानंतर दोन महिने नांदगाव शहरात शिरकाव न झालेल्या कोरोनाने अखेर येथे पाऊल टाकले असून, पहिला पॉझिटिव्ह रु ग्ण शहरात आढळून आल्याने नगर परिषद प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सदर रुग्णाची गांभीर्याने दखल घेत तीन दिवसांचा पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविलगीकरण सुरू : तीन दिवसांचा पूर्ण लॉकडाउन जाहीर

नांदगाव : लॉकडाउन सुरू झाल्यानंतर दोन महिने नांदगाव शहरात शिरकाव न झालेल्या कोरोनाने अखेर येथे पाऊल टाकले असून, पहिला पॉझिटिव्ह रु ग्ण शहरात आढळून आल्याने नगर परिषद प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सदर रुग्णाची गांभीर्याने दखल घेत तीन दिवसांचा पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.चार दिवस आधी शहरातील दोन महिलांना कोरोना संशयित म्हणून साकोऱ्याच्या सारतळे कोरोना केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. त्यापैकी एकीचा बुधवारी रात्री पॉझिटिव्ह अहवाल आला. अहवाल आल्यानंतर प्रशासनाने पहाटेच संबंधित भाग सील करण्यास सुरुवात करून कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी व विलगीकरण प्रक्रि या सुरू केली. उच्च धोका असलेल्या ७ जणांचे तातडीने विलगीकरण करण्यात आले असून, त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे. निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली आहे.कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या घरापासून ३०० मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन व ५०० मीटरपर्यंत बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. सदर रु ग्णाच्या घराच्या आजूबाजूला फळ विक्र ेत्यांची गुदामे आहेत. आंबे व्यापार मालेगाव शहराशी निगडित आहे. माहितीनुसार कोरोनाग्रस्त महिलेचे वय ५५ असून ती भाजीपाला व फळे घेण्यासाठी बाजारात जात असे. त्यामुळे समुदाय हस्तांतरणाचा धोका आहे. दरम्यान बाहेगावाहून येणारे भाजीपाला व फळ विक्रेते शहरात अद्यापही येत असल्याची माहिती आहे.कोरोनाग्रस्तांची संख्या शून्य असल्याने चौथ्या लॉकडाउनमध्ये नांदगाव शहराचा समावेश नॉन रेडझोनमध्ये करण्यात आला. त्यामुळे शहरात सर्व व्यवहार सुरु करण्याची परवानगी मिळाली. दरम्यान वारंवार मास्क वापरण्याचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात येत होते. काही अपवाद वगळता नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांची सर्रास पायमल्ली केली. एरवी आठवडे बाजाराच्या दिवशी दिसणारी गर्दी गांधी चौकात दररोज दिसू लागली. पुढील तीन दिवस किराणा, मेडिकल, दवाखाने व दूध यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य