नाशिक : शहर व ग्रामीण पोलीस भरती पक्रियेत आज पहिल्या दिवशी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांपैकी शहर विभागात ४१६, तर ग्रामीण विभागात २७५ असे एकूण ६९१ उमेदवार पहिल्या चाचणीत यशस्वी ठरले आहेत़ शहर पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर भरतीप्रक्रियेस प्रारंभ झाला़ शहर पोलीस विभागाच्या वतीने ९०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते़ पैकी आज ५७२ उमेदवार हजर होते़ या उमेदवारांची शारीरिक व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली़ यामध्ये १५६ उमेदवार अपात्र ठरले असून, मैदानी चाचणीसाठी ४१६ उमेदवार पात्र ठरले आहेत़ त्यांची मैदानी चाचणी सुरू असून, यातील पात्र उमेदवारांची निवड यादी नंतर जाहीर करण्यात येणार आहे़ याप्रसंगी पोलीस उपआयुक्त संदीप दिवाण, सहायक पोलीस आयुक्त एस़ आऱ ठाकूर आदि उपस्थित होते़ नाशिक ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने आडगाव मुख्यालय येथे आज निवड चाचणीस प्रारंभ झाला़ आज ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते़ यापैकी ४०३ उमेदवार हजर होते़ त्यांची शारीरिक व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली़ यामध्ये १२६ उमेदवार अपात्र ठरले, तर २७५ उमेदवार पात्र ठरले़ यावेळी पोलीस उपअधीक्षक सी़ एस़ देवराज उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
पहिल्या दिवशी ६९१ उमेदवार पात्र
By admin | Updated: June 7, 2014 01:48 IST