नाशिक : पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७ मधून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या चौथ्या दिवशी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागेवरून पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून, दुसऱ्या एका इच्छुक उमेदवाराने इतर मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गासाठी अनामत रक्कम जमा केली आहे. प्रभाग ७ ब या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवरून आशा संजय चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी उमेदवारी अर्जात कुटुंबाच्या एकू ण मालमत्तेचे मूल्य एक कोटी २६ लाख ८२ हजार ३२ रुपये असल्याचे नमूद केले आहे. पश्चिम विभागातून अर्ज करणाऱ्या या महिला उमेदवाराने सर्वप्रथम अर्ज दाखल करीत पक्षाच्या चिन्हाची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रभागातून त्यांना संबंधित पक्षाची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. प्रभाग ७ ब मधून पहिलाच उमेदवारी अर्ज या कोट्यधीश इच्छुकाने दाखल केल्यामुळे त्यांच्यासमोरही तुल्यबळ उमेदवार देण्याचे आव्हान अन्य पक्षांसमोर निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान, पश्चिम विभागातून योगेश हिरे यांनी इतर मागास प्रवर्ग तथा सर्वसाधारण अशा दोन जागांवरून लढण्यासाठी अनामत रक्कम जमा करून पावती घेतली आहे. (प्रतिनिधी)
पश्चिम विभागात कोट्यधीश इच्छुकाचा पहिला अर्ज
By admin | Updated: January 30, 2017 23:26 IST