शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

डिजीपीनगरला गोळीबार; सराईत गुन्हेगार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:51 IST

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक एक परिसरातील टागोरनगरच्या कॉर्नरवर अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शनिवारी (दि.19) रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख हा जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देडीजीपीनगर वसाहत रात्री झालेल्या गोळीबाराने हादरली.

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक एक परिसरातील टागोरनगरच्या कॉर्नरवर अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शनिवारी (दि.19) रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख हा जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील डीजीपीनगर वसाहत रात्री झालेल्या गोळीबाराने हादरली. नाशिकरोड बाजूकडून डीजीपी नगरमार्गे जाणाऱ्या बाबा वर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला या गोळीबारात त्याच्या डाव्या बरगडीला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबारानंतर हल्लेखोर वडाळागावाच्या दिशेने पसार झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. दरम्यान या हल्लेखोरांनी दहशत माजविण्यासाठी पुन्हा डिजीपीनगरच्या जॉगिंग ट्रॅकलगतच्या गतिरोधकाच्या परिसरात हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. दोन दुचाकींवरून हल्लेखोर हातात गावठी पिस्तुल घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्नात होते. घटनेची माहिती मिळताच तात्काळ उपआयुक्त विजय खरात, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत पडलेल्या बाबाला तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. काही हल्लेखोरांनी ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याच परिसरात महापौर सतीश कुलकर्णी यांचेही निवास्थान आहे. डिजीपीनगर ही सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी वर्गाची सर्वात जुनी गृहनिर्माण वसाहत म्हणून ओळखली जाते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे