शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमनचा ‘भोंगा’ वाजला : मुख्यालयासह उपकेंद्रांचे जवान रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:17 IST

साडेचार वाजेपर्यंत जोरदार पावसाने शहराला झोडपले आणि अग्निशमन दल अधिकच सतर्क झाले. पावसाची ही सलामी जणू त्यांच्यासाठी एकप्रकारची धोक्याची घंटा ठरली.

ठळक मुद्देमुख्यालयासह उपकेंद्रांचे जवान रस्त्यांवर जोरदार पावसाने शहराला झोडपले

नाशिक : मुंबईकडून उत्तर  महाराष्ट्रकडे निघालेल्या ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा प्रभाव बुधवारी (दि.३) शहरातही मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरुपात जाणवला. शहरात विविध ठिकाणी १९० वृक्ष कोसळल्याने अग्निशमन दलावर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. यामुळे मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी मुख्यालयासह सर्व उपकेंद्रांवरील जवानांच्या पुढील दोन दिवसांसाठी रजा रद्द केल्या आहेत.‘निसर्ग’ वादळाचा परिणाम शहरावरही तितकाच होण्याची शक्यता लक्षात घेता बुधवारी सकाळपासूनच महापालिका प्रशासनाने अग्निशमन दलाच्या सर्व जवानांच्या रजा रद्द केल्या. पुढील दोन दिवस कोणीही रजा घेणार नसून आपत्कालीन स्थिती संभवणार असल्याचे गृहित धरून सगळ्यांनी ‘अ‍ॅलर्ट’ रहावे असे आदेश देण्यात आले.बुधवारी दिवसभर पावसाची संततधार शहरात सुरू राहिली; मात्र दुपारी चार वाजेपासून हळहळु शहराचे वातावरण अधिकच बदलण्यास सुरूवात झाली. साडेचार वाजेपर्यंत जोरदार पावसाने शहराला झोडपले आणि अग्निशमन दल अधिकच सतर्क झाले. पावसाची ही सलामी जणू त्यांच्यासाठी एकप्रकारची धोक्याची घंटा ठरली. तासभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा साडेसहा वाजेपासून शहरात वादळी वार्यासह पावसाला सुरूवात झाली. मध्यरात्रीपर्यंत पावसाने शहर व परिसरात ‘वादळ’ आणले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसाचे पाणी तळमजल्यांसह उंचसखल भागात साचले आणि अग्निशमन दलाच्या अपात्कालीन मदत कार्य सुरू झाल्याचा ‘भोंगा’ वाजला. शहरात काल संध्याकाळपासून सुरू झालेले मदतकार्य गुरूवारी (दि.४) दिवसभर सुरूच होतेमुख्यालयासह उपकेंद्रांचे जवान रस्त्यांवर अग्नशमन दलाचे मुख्यालयात २५फायरमन, ८बंबचालक सर्व अत्यावश्यक सोयीसुविधांनी सज्ज होते. तसेच उपकेंद्रांनवरील जवानही सर्व सामुग्रीसह रस्त्यांवर उतरले होते. जसे कॉल मिळाले तसे तेथे दाखल होऊन कोसळलेल्या वृक्षांचा अडथळा दूर करण्यावर भर देत होते.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ