इगतपुरी : नाशिककडे जाणाºया कारने इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरात अचानक पेट घेतल्याने महिंद्रा लोगान कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन पथकाने त्वरित आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. महामार्गावरील गुप्ता पेट्रोलपंपानजीक महिंद्रा लोगन (क्र. एमएच ०१ एसी. ६५६५ ) कारने शुक्र वारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. केईएम रूग्णालयात महिन्यापासून उपचार घेत असलेले धुळे येथील भाईदास भदाणे व त्यांचा परिवार गावाकडे परतत होते. गाडी इगतपुरी शिवारात आल्यानंतर गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. या धुरामुळे रुग्ण भाईदास भदाणे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. गाडीला आग लागत असल्याचे समजताच चालकाने गाडी थांबवली. भदाणे कुटुंबीय गाडीतून बाहेर पडताच गाडीने पेट घेतला. क्षणार्थात आगीने रौद्र रूप घेतले. जवळच असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा इंजिन कंपनीला सदरची घटना समजताच कंपनीच्या अग्निशमक पथकातील फायर आॅफिसर जयेश पाटील व सहकारी मनोज भडांगे, खुशल घटकल, राजाराम शेलार यांच्या पथकाने धाव घेत अथक प्रयत्नाने तब्बल एक तासानंतर आग आटोक्यात आणली. रुग्ण भाईदास भदाणे यांना कंपनीच्या रु ग्णवाहिकेने नाशिक येथे हलवण्यात आले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. महिंद्रा कंपनीने तत्काळ दिलेल्या प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली.
इगतपुरीजवळ वाहनाला आग; जीवितहानी टळली द बर्निंग कार : प्रसंगावधान दाखवल्याने वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:54 IST
इगतपुरी : नाशिककडे जाणाºया कारने इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरात अचानक पेट घेतल्याने महिंद्रा लोगान कार जळून खाक झाली.
इगतपुरीजवळ वाहनाला आग; जीवितहानी टळली द बर्निंग कार : प्रसंगावधान दाखवल्याने वाचले प्राण
ठळक मुद्देगाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले कुटुंबीय गाडीतून बाहेर पडताच गाडीने पेट घेतला