शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अग्निसुरक्षा : अवघे १५ शिक्षण  संस्थांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:55 IST

शहरातील अग्निसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने दिलेली १५ फेबु्रवारीची डेडलाइन संपली असून, त्या कालावधीत साडेचारशे रुग्णालयांनी प्रस्ताव सादर केले असले तरी शिक्षण संस्थांनी जेमतेम १५ प्रस्ताव सादर केले आहेत.

नाशिक : शहरातील अग्निसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने दिलेली १५ फेबु्रवारीची डेडलाइन संपली असून, त्या कालावधीत साडेचारशे रुग्णालयांनी प्रस्ताव सादर केले असले तरी शिक्षण संस्थांनी जेमतेम १५ प्रस्ताव सादर केले आहेत.  राज्य शासनाने ६ जानेवारी २००८ मध्ये अग्निसुरक्षा कायदा केल्यानंतर महापालिकेने त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात केली आहे. त्यानंतर झालेल्या इमारतींना अग्निशमन सेवा कायद्यानुसार विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सक्तीच्या करण्यात आल्या होत्या. त्यातही ज्या इमारती २००८ नंतर बांधल्या गेल्या आहेत, त्यांनाच या कायद्याच्या अंमलबजावणीची सक्ती करण्यात आली आहे. तथापि, याबाबत कल्पना देऊनही अनेक इमारतींमध्ये अशाप्रकारच्या सुविधा नाहीत. शहरातील हॉस्पिटलसंदर्भात महापालिकेने केलेल्या सक्तीनंतर बराच गाजावाजा झाला; परंतु त्यानंतरही अनेक डॉक्टरांनी अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच कंपाउंडिंग चार्जेसही भरले होते. दहा बेडची रुग्णालये तसेच काही ठरावीक उंच इमारतींना दिलेल्या सवलतीमुळे सुमारे साडेचारशे रुग्णालयांचा प्रश्न मार्गी लागला असून त्यांना ‘ना हरकत दाखले’देखील देण्यात आले आहेत. त्यानंतर आणखी काही प्रकरणे प्रलंबित आहेत.  वैद्यकीय व्यावसायिकांना दरवर्षी महापालिकेकडून परवाना नूतनीकरण करावे लागत असल्याने ते प्रशासनाकडे येत असल्याने त्यांना अडवता आले, परंतु शहरातील अनेक व्यापारी संकुले, मिश्र वापराच्या इमारती तसेच शिक्षण संस्था पुन्हा महापालिकेकडे येत नसल्याने अडचण निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गेल्या वर्षाच्या अखेरीस जाहीर सूचना देऊन अशा इमारतींना १५ फेब्रुवारीपर्यंत अग्निसुरक्षा कायद्यान्वये पूर्तता करून तसा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. या मुदतीत जे मिळकतधारक पूर्तता अहवाल सादर करणार नाहीत, त्यांच्या मिळकती कोणत्याही क्षणी सील करण्यात येईल, असे महापालिकेने जाहीर केले होते. परंतु त्याला प्रतिसाद म्हणून अवघ्या १५ शिक्षण संस्थांनीच पूर्तता अहवाल करून प्रस्ताव सादर केले आहेत. महापालिकेने दिलेली डेडलाइन संपली असली तरी त्यानंतर मात्र अद्याप कोणतीही विचारणा नसल्याने मिळकतधारकदेखील थंड झाले आहेत.यंत्रणा उभारणे अनिवार्यमहापालिकेने व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांसह विविध मिळकतधारकांना आवाहन केले असले त्यात पंधरा मीटर उंच इमारती असलेल्यांनाच ही यंत्रणा उभारणे अनिवार्य आहे. त्यातच बहुतांशी शाळा इमारती बैठ्या असून, काही इमारती एक ते दोन मजली असल्याने अशा खूप शिक्षण संस्था शहरात नाहीत, असे महापालिकेचे म्हणणे आहे. तथापि, शहरात अनेक शाळा या एकाच इमारतीत सदनिकेतदेखील भरतात. त्यांना अग्निसुरक्षा कायदा २००८ लागू होत नसला तरी तेथील अग्निसुरक्षेचे काय हादेखील मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :Schoolशाळा