शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राखीव वनक्षेत्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:04 IST

डांगसौदाणे : परिसरातील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूंनी लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव पशुपक्ष्यांबरोबरच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले आहे.

ठळक मुद्देबागलाण : पश्चिम पट्ट्यातील डेरेदार वृक्ष जळून खाक वन्यजिवांबरोबर वनौषधीही नामशेष होत असल्याने चिंता

डांगसौदाणे : परिसरातील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूंनी लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव पशुपक्ष्यांबरोबरच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले आहे.गत महिनाभरापासुन हे आगीचे तांडव सुरूच असून, दररोज नवनवीन ठिकाणी राखीव वनक्षेत्राला आग लावून हे अज्ञात माथेफिरू पसार होत आहेत. गेल्या महिनाभरात दहिंदुले शिवारातील राखीव वनक्षेत्र, तताणी येथील डोंगरावरील राखीव वनक्षेत्र, दसाणा येथील राखीव वनक्षेत्र, तळवाडे येथील डोंगर राखीव वनक्षेत्र व आता डांगसौदाणे येथील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला लावलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे.काल सायकाळच्या सुमारास डांगसौदाणे शिवारातील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला लावलेल्या आगीत वनक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तींकडून लावलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल्याने वनविभागाचे कर्मचारी, वनसंरक्षक समिती सदस्य व स्थानिक शेतकºयांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अखेर रात्री ही आग विझविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत राखीव वनक्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. राखीव वनक्षेत्रातील मोर, ससे, घोरपड हे वन्यजीव आगीपासून बचाव करण्यासाठी पळ काढतात. शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या शिकाºयांच्या जाळ्यात सापडतात. तसेच या वनक्षेत्रातील साग, बांबू, शिसव अशा वृक्षांची झालेली कत्तल लपविण्यासाठी तस्करी करणाºयांकडून राखीव वनक्षेत्राला आग लावण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा परिसरात जोरात आहे. मात्र याबाबत वनविभागाकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही. आग लावणाºया माथेफिरूंचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून कुठलीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे हे अज्ञात माथेफिरू (तस्कर) बेधडक राखीव वनक्षेत्राला आग लावतात. आणि पसार होतात. यामुळे वन्यजिवांबरोबर वनौषधीही नामशेष होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.