शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

मालेगावी कापड दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:42 IST

मालेगाव : शहरातील सटाणा रोडवरील सेजल जयेश शहा यांच्या सार्थ बुटिक या कापड दुकानाला मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देमदत : अग्निशमन दलाच्या सहा बंबांनी घेतली धाव

मालेगाव : शहरातील सटाणा रोडवरील सेजल जयेश शहा यांच्या सार्थ बुटिक या कापड दुकानाला मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहा बंबांच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यात लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी गर्दी केल्यामुळे अग्निशामक दलास आग विझविण्यास मोठा व्यत्यय आला, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केल्याने कापड दुकानाच्या वर असलेल्या रुग्णालयातील खबरदारी म्हणून रुग्णांना तातडीने इतरत्र हलविण्यात आले. सेजल जयेश शहा यांच्या मालकीचे सार्थ बुटिक हे कापड दुकान आहे. यशश्री कंपाउण्डमध्ये सकाळी योगसाधना करीत असलेल्या साधकांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.सध्या शहर परिसरात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, ४२ अंशांवर तापमान पोहोचल्याने जीव लाही लाही होत आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम म्हणूनच परिसरात आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. आगीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढगेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहर व परिसरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात चंदनपुरी गेट परिसरात सुमारे तीन ते चार घरांना आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. संगमेश्वरातील सावतानगर भागात मोकळ्या जागेवरील गवताला आग लागली होती. उन्हाळ्यात आग लागण्याचे प्रकार घडत असतात. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून आपल्या आस्थापनांचे फायर आॅडिट करणे गरजेचे आहे. बहुतांशी आस्थापनांमध्ये फायर मशीन बसविण्यात आलेले नाही. मनपा नोटिसा बजावून कायदेशीर पूर्तता करून घेत आहे.