शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खंबाळेत वनविभागाच्या क्षेत्रात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:56 IST

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाच्या लागवड केलेल्या क्षेत्रात मंगळवारी (दि. ५) रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून ८ ते १० हेक्टरवर लागवड केलेली झाडे नष्ट झाली.

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाच्या लागवड केलेल्या क्षेत्रात मंगळवारी (दि. ५) रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून ८ ते १० हेक्टरवर लागवड केलेली झाडे नष्ट झाली.दातली - खंबाळेदरम्यान वनविभागाचे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या पावसाळ्यात यापैकी २५ हेक्टर जागेत वृक्षारोपण करण्यात आले आहे. या झाडांची वाढदेखील चांगली झाली आहे. मध्यरात्री लागलेल्या आगीत लागवड केलेली सुमारे २० हजार झाडे जळाली असून, मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली याबद्दल वनविभागाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सिन्नर तालुक्यात वनविभागाचे सर्वाधिक क्षेत्र खंबाळेत आहे. या क्षेत्रात चराई बंद असल्यामुळे गवत जास्त आहे.आग लागल्याचा प्रकार बघितल्यावर शेतकरी चिंतामण आंधळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. तोपर्यंत त्यांच्याकडे कामाला असणाºया मजुरांना घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. निरोप मिळाल्यावर वनविभागाचे कर्मचारी, गावातील युवक मदतीला धावले. मात्र, पण आगीची भीषणता मोठी होती. अचानक लागलेली आग आटोक्यात आणताना सर्वांच्या नाकीनऊ आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली; मात्र १० हेक्टर क्षेत्रातील हजारो झाडे जळून गेली होती.बुधवारी (दि. ६)दुपारी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल अनिल साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

टॅग्स :Nashikनाशिक