येवला : शहरातील तहसील कार्यालायासमोरील पेट्रोलपंपा-लगतच्या खाराबाग परिसरात आज (दि. १२) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मक्याच्या चाऱ्याला आग लागून सुमारे ७० हजारांचा चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.या आगीपासून साधारण २० ते २५ मीटर अंतरावर सी.डी. पटणी यांचा पेट्रोलपंप आहे. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ ठळला. भूषण पटेल यांनी येवला पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविल्याने तातडीने अग्मिशमन वाहन आल्याने आग आटोक्यात आली. (वार्ताहर)
येवल्यात भीषण आगीत चारा भस्मसात
By admin | Updated: December 12, 2015 22:35 IST