शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अग्नीशमन बंबाचा वापर शौचालयाच्या स्वच्छतेसाठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:54 IST

भगूर : भगुर नगरपालिकेने अग्निसुरक्षेसाठी खरेदी केलेली अग्निशमन गाडी प्रशिक्षित कामगारांअभावी शौचालय साफसफाई करीता वापरली जात असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. भगूर नगरपालिका हद्दीत कुठेही आग लागल्यास आग विझविण्यासाठी स्वत:ची यंत्रणा असावी यासाठी भगूर नगर परिषदेने मराठी शाळेजवळ सन २०१५ साली फायर स्टेशन इमारत व अग्निशमन कामगारांना घरे तयार करून ...

ठळक मुद्देभगूर नगरपालिकेचा प्रकार : प्रशिक्षीत कर्मचा-यांचा अभाव  बंबाचा उपयोग गेल्या तीन वर्षापासून उन्हाळ्यात टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्यासाठी

भगूर : भगुर नगरपालिकेने अग्निसुरक्षेसाठी खरेदी केलेली अग्निशमन गाडी प्रशिक्षित कामगारांअभावी शौचालय साफसफाई करीता वापरली जात असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. भगूर नगरपालिका हद्दीत कुठेही आग लागल्यास आग विझविण्यासाठी स्वत:ची यंत्रणा असावी यासाठी भगूर नगर परिषदेने मराठी शाळेजवळ सन २०१५ साली फायर स्टेशन इमारत व अग्निशमन कामगारांना घरे तयार करून लाखो रुपयांचर बंब खरेदी केला व जनतेच्या घरपट्टीत अग्निशमन कर वसूल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या अग्निशमन दलात काम करण्यासाठी प्रशिक्षित फायरमन कामगार आजपर्यंत भरले नाहीत. परिणामी भगुर गावात अनेक वेळा आग लागुनही ती विझविण्यासाठी देवळाली छावणी परीषद किंवा नाशिक महापालिकेचे बंबांची मदत घ्यावी लागली आहे. भगूर पालिकेची अग्निशमन केंद्र इमारत रिकामी असुन बंब समतावाडीतील पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्रावर उभी करून ठेवलेली असते. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांसाठी बांधण्यात आलेल्या घरामध्ये पालिकेचे कामगार, शिपायांचे वास्तव्य आहे.अग्नीशमनासाठी खरेदी केलेल्या बंबाचा उपयोग गेल्या तीन वर्षापासून उन्हाळ्यात टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्यासाठी केला जातो आणि पावसाळ्यात सार्वजनिक शौचालय साफसफाई करण्यास अग्निशमन गाडी वापरली जात असून, यासंदर्भात भगूर पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, नाव न सांगण्याच्या अटीवर सुत्राने सांगितले की, शहराच्या अग्नीसुरक्षेसाठी अग्निशमन दलाचे यंत्रणा उभारली असली तरी, त्यासाठी प्रशिक्षित कामगार भरती करण्याचा अधिकार जिल्हाधिका-यांना आहे. या बाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येवूनही कर्मचारी भरतीसाठी अनुमती मिळत नाही त्यामुळे अग्निशमन गाडीचा वापर इतरस्त करावा लागतो नाहीतर गाडी खराब होण्याची शक्यता आहे.    

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक