शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

गंजमाळजवळील भंगार दुकानाला आग

By admin | Updated: November 15, 2015 23:59 IST

सुदैवाने जीवितहानी नाही : गॅस गुदाम थोडक्यात बचावले

गंजमाळजवळील भंगार दुकानाला आगसुदैवाने जीवितहानी नाही : गॅस गुदाम थोडक्यात बचावलेनाशिक : गंजमाळमधील एका भंगार दुकानाला रविवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली़ दुकानातील भंगारच्या वस्तूंनी पेट घेतल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले़ सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंबांच्या साहाय्याने दोन तासांचे अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले़ दरम्यान, या दुकानाशेजारी असलेले मयूर गॅस एजन्सीचे गुदाम थोडक्यात बचावले असून, त्याने पेट घेतला असता तर मोठी हानी झाली असती़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंजमाळ परिसरामध्ये कुतुबुद्दीन शेख यांचे भंगारचे दुकान आहे़ रविवारी (दि़१४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली़ या दुकानामध्ये पुठ्ठे, प्लास्टिकच्या बाटल्या, कागदे, तसेच भंगारच्या वस्तू असल्याने त्यांनी त्वरित पेट घेतला़ थोड्याच वेळात या आगीने रौद्र रूप धारण केले़ या गुदामाशेजारील दाटीवाटीने असलेल्या घरांमधील नागरिकांच्या आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला फोन करून घटनेची माहिती दिली़या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन, स्टेशन आॅफिसर पी़ व्ही़ तिडके, सब आॅफिसर डी़ बी़ गायकवाड, जे. एस. अहिरे, लिडिंग फायरमन डी़ ए़ चंद्रमोरे, फायरमन आऱ आऱ पवार, व्ही़ जी़ नागपुरे, आऱ एस़ नाकील, एस़ एस. आगलावे हे बंबांसह घटनास्थळी पोहोचले़ शिंगाडा तलावातील तीन, सिडकोतील एक व पंचवटीतील एक अशा पाच बंबांच्या साहाय्याने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली़गंजमाळच्या ज्या भंगार दुकानाला आग लागली त्याच्या शेजारीच मयूर गॅस एजन्सी असून, त्यामध्ये भरलेले सिलिंडर ठेवलेल्या बाजूलाच एलपीजी गॅस सिलिंडरचे गुदाम होते़ त्यास आग लागली असती तर संपूर्ण पंचशीलनगर उद्ध्वस्त झाले असते़ या आगीचे कारण समजू शकले नसून स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी विशेष प्रयत्न केले़ दरम्यान, या घटनेची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)