शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घोरवड घाटात अपघातग्रस्त केमिकलच्या टॅँकरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 16:59 IST

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड घाटात उलटलेल्या केमिकलच्या टँकरला आग लागून परिसरातील झाडे जळून खाक होण्यासह टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बुधवारी (दि.८) रात्री आठ वाजता लागलेली आग तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर विझविण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड घाटात उलटलेल्या केमिकलच्या टँकरला आग लागून परिसरातील झाडे जळून खाक होण्यासह टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बुधवारी (दि.८) रात्री आठ वाजता लागलेली आग तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर विझविण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अहमदनगरकडून मुंबईच्या दिशेने केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा (एम. एच. ४६ ए. एफ. ४२९९) घोरवड घाटात अपघात झाला होता. दिवसभर टँकर घोरवड घाटात उलटलेल्या अवस्थेत होता. टँकरला गळती लागल्याने त्यातून काही प्रमाणात केमिकलची गळती होत होती. बुधवारी रात्री साडेसात-आठ वाजेच्या सुमारास अचानक गळती झालेल्या केमिकल व टॅँकरला आग लागली. त्यामुळे घोरवड घाटात आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. टँकरनेही पेट घेतला. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव, हवालदार बाबा पगारे, योगेश बुरकुल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिन्नर नगर परिषद व एमआयडीसीच्या अग्निशामक बंबांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. अपघात होऊन टँकर दिवसभर घाटात पडून होता. त्यामुळे त्यात चालक किंवा अन्य कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील अनेक झाडे जळून खाक झाली.

टॅग्स :Nashikनाशिक