शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दरेगावी मुक्काम ठोकणाऱ्यास पाच हजाराचा दंड ठोठावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:58 IST

ग्रामपालिकेचा निर्णय : कोरोना प्रतिबंधीत उपाययोजना

ठळक मुद्देनिर्णयाचे दरेगाव ग्रामस्थांसह आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनी स्वागत केले आहे

सटाणा : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने लॉकडाऊन जाहीर झालेला असतानाच बागलाण तालुक्यातील दरेगाव ग्रामपंचायत व तंटामुक्ती समिती यांनी गाव पातळीवर निर्णय घेत गावातील कुणालाही कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावास मुक्कामी येण्यास अथवा बाहेरगावी जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.दरेगाव ग्रामपंचायत हद्दीत बाहेरगावच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकाला मुक्कामी येण्यास व दरेगाव मधील कोणत्याही व्यक्तीस बाहेरगावी मुक्कामी जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून असे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीकडून किंवा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून पाच हजार शंभर रु पयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.तसेच मास्क न लावता गावात फिरणाºया व्यक्तींविरोधात देखील ग्रामपंचायत प्रशासनाने कडक पावले उचलत अशा व्यक्तींकडून १५१ रु पये दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.गत दोन दिवसांपासून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे दरेगाव गावात बाहेरगावातील कोणतीही व्यक्ती मुक्कामाला आल्याचे आढळून आलेले नसून ग्रामपंचायत प्रशासन व तंटामुक्ती समितीच्या सदस्यांचे गावातील प्रत्येक कुटुंबावर बारीक लक्ष असल्याने दरेगावातील कोणतीही व्यक्ती दुसºया गावात मुक्कामाला गेल्याचे आढळून आलेली नाही. या निर्णयाचे दरेगाव ग्रामस्थांसह आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनी स्वागत केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे दरेगाव ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदी असून दारू विकण्यास व पिण्यास मनाई आहे. मागील आठवड्यात दरेगाव ग्रामपंचायत प्रशासन व तंटामुक्ती समिती यांनी दारू विक्र ी करणाऱ्यांवर व दारू पिणाºयांवर धडक कारवाई करत एकाच दिवसात तब्बल ४३ हजार रु पयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक