शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

यात्रोत्सवानिमित्त गडावर चोख आरोग्य व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 19:47 IST

नवरात्रोत्सवात दहा दिवस सप्तशृंगगडावर यात्रा भरते. देशाच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येत असल्याने लाखोंची गर्दी होत असते. दोन दिवसांपूर्वीच गडावर तुफान पर्जन्यवृष्टी झाली असून, त्यामुळे रोगराई व पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता गडावर रोगराई टाळण्यासाठी

ठळक मुद्देवैद्यकीय पथके तैनात : औषधे, रुग्णवाहिका सज्ज ट्रस्टच्या जागेवर तीन कार्डियाक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आले

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : नवरात्रनिमित्त अर्धशक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर भरणाऱ्या यात्रेसाठी येणाºया लाखो भाविकांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्वतोपरी काळजी घेतली असून, नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सुमारे शंभराहून अधिक कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी जागोजागी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

नवरात्रोत्सवात दहा दिवस सप्तशृंगगडावर यात्रा भरते. देशाच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येत असल्याने लाखोंची गर्दी होत असते. दोन दिवसांपूर्वीच गडावर तुफान पर्जन्यवृष्टी झाली असून, त्यामुळे रोगराई व पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता गडावर रोगराई टाळण्यासाठी आरोग्य विभागाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सूचना केल्या आहेत. सप्तशृंग गडाच्या पायथ्यापासून ते पायी रस्ता व गडावर ठिकठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नांदुरी गावात जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, याठिकाणी वैद्यकीय पथक असेल शिवाय १०८ रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे. पायी जाणा-या मार्गावर छत्री पॉइंटवर एक रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक ठेवण्यात आले आहे. गडावरील रोप-वेच्या ठिकाणी डे केअर सेंटर, सप्तशृंग ट्रस्टच्या इमारतीत चोवीस तास आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय पथक आहे. गडाच्या पायºयांजवळील राममंदिराजवळही डे केअर सेंटर तसेच शिवालयाजवळ रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. ट्रस्टच्या जागेवर तीन कार्डियाक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आले आहेत.यात्रेपूर्वीच आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असून, गावातील पाणी नमुने घेऊन ते तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत तसेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी टीसीएल पावडर टाकण्यात आली असून, आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकाºयांकडे औषधाचा पुरेसा साठा ठेवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद