शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील मोफत प्रसाधनगृहांना मिळेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:28 IST

शहरातील हॉटेल्समधील प्रसाधनगृहे मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा महापालिकेने केली असली तरी अद्याप कोठेही अशाप्रकारचे फलक लावण्यात आल्याचे आढळले नसून त्यामुळे महापालिकेच्या उत्साही प्रयोगाचे संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नाशिक : शहरातील हॉटेल्समधील प्रसाधनगृहे मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा महापालिकेने केली असली तरी अद्याप कोठेही अशाप्रकारचे फलक लावण्यात आल्याचे आढळले नसून त्यामुळे महापालिकेच्या उत्साही प्रयोगाचे संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.  शहरात अपुरी प्रसाधनगृहे असल्याने नागरिकांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. महापालिकेने नवीन प्रसाधनगृहे बांधण्याची तयारी केली, परंतु त्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने पालिका प्रशासन हतबलता व्यक्त करीत आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेने खासगी हॉटेल व्यावसायिकांनाच मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्यांनी हॉटेलबाहेर महिलांसाठी मोफत प्रसाधनगृहाचे फलक लावण्याचे ठरविण्यात आले. नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली.त्यानुसार शहरातील अनेक हॉटेल्समध्ये फलक लावण्यात येणार होते. हैदराबाद आणि दिल्लीनंतर प्रथमच नाशिकमहापालिकेने अशाप्रकारचे फलक लावल्याचा गवगवा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र अशाप्रकारे कोणतेही फलक लावल्याचे आढळत नाही. महापालिकेनेदेखील अशा हॉटेल्सची नावे जाहीर केली नसून त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.कायद्यात तरतूदमुळातच हा प्रयोग महापालिकेने प्रथमच केल्याचा आव आणला. .हॉटेल व्यावसायिकांसाठीच्या कायद्यात तशी तरतूद आहे. सराय अ‍ॅक्टनुसार जेथे रक्कम देऊन पांथस्थ वास्तव्याला राहतात, त्याठिकाणी कोणत्याही व्यक्तीने म्हणजे केवळ महिला नव्हे तर कोणीही व्यक्ती आली तर त्यांना व त्यांच्याकडील पाळीव प्राण्याला पिण्याच्या पाण्याची सोय करणे तसेच त्यांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचीच तरतूद आहे. ती न केल्यास महापालिका कारवाई करू शकते. परंतु ते सोडून महापालिकेने आवाहन केले आणि त्यालाही अद्याप हॉटेलचालकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळालेला नसल्याने आता या सर्व प्रयोगाच्या यशस्वीतेचा शोध घेण्याची गरज निर्माण आली आहे.