शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हाजी अली माहीम ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:44 IST

मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टीच्या आगीत दुर्घटनाग्रस्त झालेल्यांना हाजी अली माहीम ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत केली जाईल. खऱ्या लाभार्थ्यांना मदतीचा लाभ दिला जाईल. याप्रश्नी राजकारण करू नये, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केले आहे.

मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टीच्या आगीत दुर्घटनाग्रस्त झालेल्यांना हाजी अली माहीम ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत केली जाईल. खऱ्या लाभार्थ्यांना मदतीचा लाभ दिला जाईल. याप्रश्नी राजकारण करू नये, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केले आहे.गेल्या शनिवारी येथील नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १६० झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख यांनी जळीत झोपडपट्टीची पाहणी करुन दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शेख म्हणाले की, येथील पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे घटनेबाबत फोन आले होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन दुर्घटनाग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देवू. अत्यावश्यक साहित्य तातडीने पुरविण्यात येईल. आगीची चौकशी सुरू आहे. आगीची दुर्घटना कशी घडली याची चौकशी सुरू आहे. शहरवासियांनी प्रशासनाला सहकार्य करावे. दुर्घटनाग्रस्तांना मदत, पुनर्वसन व इतर मदतीबाबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून चर्चा केली आहे. हाजी माहीम ट्रस्टच्या माध्यमातून मदत केली जाईल. येत्या १३ नोव्हेंबरपासून राज्यातील ३६ जिल्ह्यांचा दौरा करुन सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेणार आहोत. येथील यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या अडचणींबाबत यंत्रमागधारकांनी निवेदन सादर करावे. संबंधित मंत्र्यांना याबाबत कळविण्यात येईल. येथील शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. इंटरनॅशनल लेव्हलच्या शाळांची गरज आहे. व्यक्तीमत्व विकास शिबिरे घेणे गरजेचे आहे. उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविण्यासाठी मराठी शिक्षक नेमणे गरजेचे आहे. शहराचा विकास झाला पाहिजे. विकास कामांचा प्रस्ताव अल्पसंख्यांक आयोग व राज्य शासनाकडे सादर केला तर शासन याबाबत अनुकुल असल्याचे शेख यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले.

टॅग्स :fireआग