शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

चैत्रोत्सव रद्दचा महामंडळाला बसणार आर्थिक फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 20:43 IST

कळवण : कोरोनामुळे देशभरात उद्योग, व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन गोरगरिबांचे हक्काचे वाहन म्हणून धावणाऱ्या एसटी बसेसलाही फटका बसणार आहे. सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव रद्द झाल्याने एस.टी.चे तब्बल अडीच कोटी रु पयांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : अडीच कोटींचे होणार नुकसान; कळवण आगाराला बसणार झळ

मनोज देवरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कोरोनामुळे देशभरात उद्योग, व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन गोरगरिबांचे हक्काचे वाहन म्हणून धावणाऱ्या एसटी बसेसलाही फटका बसणार आहे. सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव रद्द झाल्याने एस.टी.चे तब्बल अडीच कोटी रु पयांचे आर्थिक नुकसान होणार आहे.नाशिक विभागात चैत्रोत्सवात परिवहन महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळत असल्याने तोट्यातील महामंडळाला आधार ठरणारा चैत्रोत्सवच रद्द झाल्याने मोठा आर्थिक फटका एसटीला बसणार आहे. खान्देशातील लाखो भाविक भगवतीच्या दर्शनाला गडावर येत असतात.नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक गडावर येत असल्याने एस. टी. महामंडळाला या यात्रोत्सवाचा मोठा आर्थिक हातभार लागत होता. वर्षभरातील इतर वेळच्या तुलनेत चैत्रोत्सवात मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने एस.टी.ला ही यात्रा महत्त्वाची ठरत असते.मागील वर्षी चैत्रोत्सवात नाशिक जिल्ह्यातील तीन लाख ६० हजार, धुळे जिल्ह्यातील १ लाख १० हजार तर जळगाव जिल्ह्यातील ८३ हजार अशा एकूण ५ लाख ५३ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा तर महाराष्ट्रात शेतमालाला चांगला भाव मिळालेला असल्याने व सुटीच्या कालावधीत यात्रा येत असल्याने साडेसहा लाख प्रवासी महामंडळाला अपेक्षित होते.मागील वर्षी अडीच कोटी रु पये उत्पन्न मिळालेल्या महामंडळाला यंदा पावणेतीन कोटी रु पये उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र कोरोनामुळे प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चैत्रोत्सव रद्द केला असल्याने यंदा महामंडळाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.आगाराचे मोठे नुकसानआदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. चैत्रोत्सव हा आमच्यासाठीही महत्त्वाचा असतो. भाविकांच्या सेवेचे समाधान आनंददायी असते. मात्र यंदा संसर्गजन्य आजारामुळे यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय झाला असल्याने आगाराला आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.- हेमंत पगार,आगार व्यवस्थापक, कळवणमागील वर्षी बसफेºया आणि उत्पन्नजिल्हा बस संख्या फेºया उत्पन्ननाशिक - ४६० ८१८४ १ कोटी २० लाखधुळे - २५३ १७६३ ६३ लाखजळगाव - २०२ १६२० ५२ लाख

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळTempleमंदिर