शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर नाशकातील वाहन उचलेगिरीचा सिलसिला थांबलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 17:48 IST

या कारवाईबाबत नागरिकांचा आक्षेप नव्हता; मात्र टोइंग वाहनावरील ठेकेदाराच्या ‘त्या’ लोकांकडून नागरिकांना दिली जाणारी वागणूकीविषयी प्रचंड रोष जनसामान्यात निर्माण झाला.

ठळक मुद्देप्रतीमा मलीन होत आहे, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अखेर पटले. नाशिककरांनो कर्तव्य आपलेच आहे

नाशिक : स्वत:च पोलीस असल्याचा अर्विभाव बाळगणे, सर्वसामान्य नागरिकांशी उद्धटपणे बोलणे, दुचाकी निर्दयीपणे उचलत नुकसान करणे अशा एक ना अनेक तक्रारींचा पाढा ‘टोइंग’ कारवाई’बाबत नाशिककरांकडून वाचला जात होता; मात्र पोलीस प्रशासनाला त्याविषयी फारसे गांभीर्य वाटत नव्हते. टोइंगचा ठेका देताना घालून दिलेले नियम, निकष पायदळी तुडवून जनमानसात टोइंगमुळे पोलिसांची प्रतीमा मलीन होत आहे, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अखेर पटले. त्यामुळे त्यांनी ‘टोइंग’चा सिलसिला तुर्तास थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहे.शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून रस्त्यांच्याकडेला रहदारीला अडथळा निर्माण होईल, या पध्दतीने वाहने उभी करणाºया वाहनचालकांची वाहने उचलून नेली जात होती. दंडात्मक कारवाईनंतर वाहनाचा ताबा त्या वाहनचालकाला पुन्हा दिला जात होता. या कारवाईबाबत नागरिकांचा आक्षेप नव्हता; मात्र टोइंग वाहनावरील ठेकेदाराच्या ‘त्या’ लोकांकडून नागरिकांना दिली जाणारी वागणूकीविषयी प्रचंड रोष जनसामान्यात निर्माण झाला. यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना नाशिककरांच्या मनात पोलिस दलाविषयीदेखील नकारात्मक भावना वाढीस लागली. अनेकदा नागरिकांनी त्यांच्या तक्रारी थेट सहायक आयुक्तांपासून तर थेट आयुक्तांपर्यंत पोहचविल्या. यानंतर नांगरे-पाटील यांनी टोइंग वाहनावरील मुलांना बोलावून त्यांना शिस्तीचे ‘धडे’देण्याचे अधिकाऱ्यांना फर्मानही सोडले. त्यानुसार ‘हजेरी’ घेतली गेली; परंतू नव्याचे नऊ दिवस काहीसा सुधार जाणवला; पुन्हा तेच पहिले पाढे...’ त्यामुळे अखेर संबंधित ठेकेदाराचा टोइंगचा वादातीत ठेकाच रद्द करण्याचा आदेश पोलीस प्रशासनाकडून घेतला गेला. त्यामुळे नाशिककरांची टोइंगवाल्यांच्या जाचातून तुर्तास तरी मुक्तता झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे....पण, नाशिककरांनो कर्तव्य आपलेच आहेटोइंग ठेका रद्द झाल्यानंतर नाशिककरांनी आपले कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक भान राखून रहदारीला अडथळा होणार नाही, या पध्दतीने आपली वाहने शिस्तबध्दरित्या उभी करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाहतुक कोंडीचा त्रास सर्वसामान्यांनाच करावा लागतो, याची जाणीव ठेवून आपल्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळेल, असे वर्तन टाळण्याची गरज असल्याचे वाहतूक शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयTrafficवाहतूक कोंडी