शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

मविप्र संस्थेत " ठाकरे राजवटी " चा अखेर उदय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2022 00:25 IST

रयत शिक्षण संस्थेनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकच्या मविप्र संस्थेत लोकशाही मार्गाने सत्तांतर झाले. दोन दशके ह्यपवार युगाह्णचा करिष्मा होता. डॉ. वसंतराव पवार यांनी आठ वर्षे तर डॉ.नीलिमा पवार यांनी १२ वर्षे या संस्थेची धुरा सांभाळली. अध्यक्षपदाचा उमेदवार वगळता पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलचे सर्व २० उमेदवार पराभूत झाले. गेल्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभूत झालेल्या ॲड. नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने देदीप्यमान यश मिळविले. जय पराजयाटी कारणमीमांसा दोन्ही गटांकडून केली जाईल. त्यात प्रस्थापितांविषयी असलेली नाराजी प्रामुख्याने होती. पॅनलचे गणित जुळविताना सत्ताधारी गटाला सर्वाधिक कसरत करावी लागते. ती प्रगती पॅनलला करावी लागली आणि त्याचा फटका बसला. परिवर्तन पॅनलने विरोधक या नात्याने आक्रमक प्रचार करीत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, सभासदांना अपमानास्पद वागणूक अशी आरोपांची राळ उठवली. त्याला प्रत्युत्तर देण्यात प्रगती पॅनल कमी पडले.

ठळक मुद्देदोन दशकांच्या ह्यपवार युगाह्णचा धक्कादायक अस्त; पक्षीय किनार लाभल्याने राजकीय क्षेत्रावर दूरगामी परिणामठाकरेंच्या रणनीतीला कमालीचे यशपवार गटाची रणनीती असफलपवारांच्या आशीर्वादाचे गुपित उघडपॅनल पडले; ढिकले एकटे जिंकलेराजकारणावर परिणाम करणारा निकाल

मिलिंद कुलकर्णी रयत शिक्षण संस्थेनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकच्या मविप्र संस्थेत लोकशाही मार्गाने सत्तांतर झाले. दोन दशके ह्यपवार युगाह्णचा करिष्मा होता. डॉ. वसंतराव पवार यांनी आठ वर्षे तर डॉ.नीलिमा पवार यांनी १२ वर्षे या संस्थेची धुरा सांभाळली. अध्यक्षपदाचा उमेदवार वगळता पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलचे सर्व २० उमेदवार पराभूत झाले. गेल्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभूत झालेल्या ॲड. नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने देदीप्यमान यश मिळविले. जय पराजयाटी कारणमीमांसा दोन्ही गटांकडून केली जाईल. त्यात प्रस्थापितांविषयी असलेली नाराजी प्रामुख्याने होती. पॅनलचे गणित जुळविताना सत्ताधारी गटाला सर्वाधिक कसरत करावी लागते. ती प्रगती पॅनलला करावी लागली आणि त्याचा फटका बसला. परिवर्तन पॅनलने विरोधक या नात्याने आक्रमक प्रचार करीत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, सभासदांना अपमानास्पद वागणूक अशी आरोपांची राळ उठवली. त्याला प्रत्युत्तर देण्यात प्रगती पॅनल कमी पडले.ठाकरेंच्या रणनीतीला कमालीचे यशअल्पशा मताने पराभव होऊनही नव्या जोमाने, उत्साहाने पुढील निवडणुकीच्या तयारीला लागण्याची ॲड. नितीन ठाकरे यांची कार्यशैली त्यांना या मोठ्या विजयाप्रत घेऊन गेली. पाच वर्षे वार्षिक सभा, विविध मंचाद्वारे संस्थेच्या कारभाराविरुद्ध त्यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यातूनच निवडणुकीसाठी मातब्बरांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले. नात्या-गोत्याचे राजकारण आणि प्रादेशिक संतुलन हे दोन महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरतात, हे लक्षात घेऊन स्वत: चांदवडचे असले तरी ४० टक्के मतदार असलेल्या निफाड तालुक्यातील सहा उमेदवारांना पॅनलमध्ये संधी दिली. ही खेळी यशस्वी ठरली. निफाड तालुक्याबाहेर सरचिटणीसपद गेले तरी सहा संचालक या तालुक्यातील असल्याचा आनंद या तालुक्याला वाटला. एकीकडे नीलीमाताई, त्यांची मुले प्रणव व अमृता यांच्या हस्तक्षेपाविषयी टीका करीत असतानाच पवार कुटुंबातील डी.बी. मोगल यांना पॅनलमध्ये स्थान देऊन वेगळा संदेश दिला.

पवार गटाची रणनीती असफलप्रस्थापितांना सत्ता राखणे मोठे कठीण असते. शिक्षण संस्थेत तर आणखी अवघड काम असते. नीलिमाताई पवार यांच्या गटाने संस्थेची प्रगती केली, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. आकडेवारी आणि वस्तुस्थिती त्याचे निदर्शक आहे. मात्र सत्ता राबविताना होणाऱ्या चुका टाळणे, खूप महत्त्वाचे असते. संस्थेत पदे असली तरी निर्णय सामूहिकपणे झाले तर ते गुणवत्तापूर्ण होतात. कोरोना काळाचा फटका या गटाला बसला. वैद्यकीय महाविद्यालयाचा या काळातील कारभार प्रचाराचा मुद्दा ठरला. अनेक महाविद्यालय, शाळांच्या नवीन इमारती, नामकरण हे कोरोना काळात करता न आल्याने निवडणुकीच्या दोन महिने आधी ती झाली, त्याकडे निवडणूक स्टंट असेच बघितले गेले. मतदारांशी संवाद आणि संपर्क त्यातून साधला गेला नाही. वारस सभासद नोंदणी, जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना सभासदत्व हे मुद्दे देखील परिणामकारक ठरले. पाच वर्षांत केलेल्या प्रगतीचे गुणगान करीत असताना विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे देण्याऐवजी दुर्लक्ष करणे अंगलट आले.

पवारांच्या आशीर्वादाचे गुपित उघडनिवडणूक जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी शरद पवार यांचा नाशिक मुक्काम या संस्थेच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. दोन्ही गटांनी पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला. श्रीराम शेटे यांच्या सरचिटणीसपदाच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेवरून पवार यांनी प्रगती पॅनलच्या सूत्रधार नीलिमाताई पवार यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याची चर्चा पसरली. मात्र स्वत: शेटे यांनी प्रगती पॅनलच्या प्रचारात सहभागी होऊन या चर्चेतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार यांची राजकीय कार्यशैली ठाऊक असलेल्या मंडळींना योग्य संदेश यातून गेलाच. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात शरद पवार यांचा वावर आहे. या क्षेत्रातील मंडळींशी सातत्यपूर्ण संपर्क आणि संवाद असतो. त्यामुळे कोणत्या संस्थेत काय चालू आहे, याची बित्तंबातमी त्यांना असते. योग्यवेळी अचूक संदेश देण्याचे कसब त्यांनी अनेकदा दाखविले आहे. त्याचा पुन्हा प्रत्यय आला.

पॅनल पडले; ढिकले एकटे जिंकलेॲड. नितीन ठाकरे यांना मविप्रमध्ये संपूर्ण परिवर्तन घडवून आणताना केवळ अध्यक्षपदाचा अपवाद ठरला. आक्रमक नेते म्हणून परिचित असलेल्या माणिकराव कोकाटे यांचा पराभव करून डॉ. सुनील ढिकले हे विजयी झाले. प्रगती पॅनलचे एकमेव विजयी ठरलेले उमेदवार म्हणून त्यांची नोंद झाली. आश्चर्याचा धक्का देणारा हा निकाल होता. मुळात अध्यक्षपदावरून प्रगती पॅनलमध्ये नाट्य रंगले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असताना डॉ. सुनील ढिकले यांना बढती देण्यात आली. उत्तमराव ढिकले यांची पुण्याई आणि आमदार राहुल ढिकले यांचे प्रयत्न कामी आले आणि यश मिळाले. याउलट कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे याच काळात विरोधात उभे ठाकल्याचे दिसले. सर्व पॅनल विजयी झाले आणि केवळ कोकाटे कसे पडले? सर्व पॅनल पराभूत झाले आणि केवळ ढिकले कसे विजयी झाले? या प्रश्नांचे कोडे लवकर उलगडणार नाही. मतदानाच्या पद्धतीनुसारदेखील हे आश्चर्यकारक आहे. यथावकाश कारण पुढे येईल.

राजकारणावर परिणाम करणारा निकालशिक्षण संस्थेची निवडणूक असली तरी राजकीय शिलेदारांच्या सहभागाने ही निवडणूक गाजली. निकालानंतर त्याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर तसेच पुढे होणाऱ्या निवडणुकांवर निश्चितच होणार आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे २० महिने शिल्लक आहेत. त्याची चर्चा या निवडणुकीदरम्यान सुरू झाली. हेमंत गोडसे यांनी शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांची इच्छा आहे. त्याच सोबत त्यांचा पराभव केलेल्या डॉ. सुनील ढिकले यांचे बंधू आमदार राहुल ढिकले यांनाही लोकसभा निवडणूक लढवायची आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कोकाटे आणि ढिकले यांनी मतदारसंघात चाचपणी करून पाहिली. भाजपमध्ये दिनकर पाटील हेदेखील प्रयत्नशील आहेत. या समीकरणांचा प्रभाव निवडणुकीवर राहिला, असा होरा राजकीय तज्ज्ञांचा आहे. त्यानंतर विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकांची समीकरणेदेखील या निवडणुकीत जुळविण्याचा प्रयत्न झाला.

टॅग्स :PoliticsराजकारणmarathaमराठाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस