शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अखेरीस सुर्वे वाचनालय खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:50 IST

मागील आठवड्यात महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका, वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात आली असताना यात अश्विननगर येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयालाही सील लावण्यात आले होते.

सिडको : मागील आठवड्यात महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका, वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात आली असताना यात अश्विननगर येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयालाही सील लावण्यात आले होते. यामुळे सर्वत्र नाराजी पसरली असताना अखेरीस मनपाने वाचनालयाचे दार उघडे केले.महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या आधारे मनपाने नाशिक शहरासह सिडको भागातील त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका, वाचनालय, समाजमंदिर, व्यायमशाळा तसेच धार्मिक मंदिरेदेखील सील करण्याची मोहीम राबविली. या मोहिमेमुळे सिडको भागासह सर्वत्र मनपाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले होते. याबाबत सिडको भागातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने निषेधही नोंदविण्यात आला होता. यानंतर काही प्रमाणात मनपाने याकडे नरमाईची भूमिका घेतली. परंतु ज्या मिळकती मनपाने सील केल्या आहेत त्यांना रेडीरेकनरनुसार भाडे आकारण्याचा घाट घातला असून, त्यास कडाडून विरोध केला जात आहे. यात मनपाने अश्विननगर येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयदेखील सील केले असल्याने सिडकोवासीयांमध्ये नाराजी होती. अखेरीस मनपाने काही अटी-शर्तीच्या अधीन राहून सुर्वे वाचनालय खुले केले आहे.वाचनालयाचा लौकिकअश्विननगर येथील सुर्वे वाचनालयात सुर्वे यांना मिळालेले जनस्थान, पद्मश्री, संत कबीर या पुरस्कारांसह २५० हून अधिक पुरस्कार आहेत. तसेच ३० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा याबरोबरच आरोग्य वैद्यकीय मदत केंद्र, विविध कोर्सेसचे मोफत ट्रेनिंग सेंटर आदी सुविधा याठिकाणी आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाlibraryवाचनालय