नाशिक : श्रावणी सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिकेची कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित केली असताना लंच टाईमनंतर दुपारीच कार्यालयातून गायब होत श्रावणी ‘हाफ डे’ घेणाºया कामचुकार कर्मचाºयांना अखेर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दणका दिला असून, पुढील दोन्हीही श्रावणी सोमवारी दोन तासांची देण्यात येणारी सुटीच रद्द करून टाकली आहे. त्यामुळे उर्वरित श्रावणी सोमवारी महापालिकेचे संपूर्ण दिवसभर कामकाज चालणार आहे. श्रावणी सोमवारच्या सुटीचा गैरफायदा घेत अगोदरच कार्यालयातून गायब होणाºया कर्मचाºयांचा आॅखो देखा हाल ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे मांडला होता.महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून श्रावणी सोमवारी अर्ध्या दिवसाची सुटी देण्याची प्रथा आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रावणी सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतच कामकाज चालविले जाते. त्यानंतर कर्मचाºयांना सुटी दिली जाते. कर्मचाºयांना उपवास सोडण्यासाठी सदर सुटी दिली जात
अखेर महापालिकेतील श्रावणी सोमवारची सुटी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:26 IST