शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महापालिकेला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:31 IST

येथील प्रभाग क्र मांक २५ मधील कामटवाडेरोड ते दुर्गानगर या परिसरातील एलईडी दिवे गेल्या सोमवारी (दि.९) मध्यरात्री अचानक बंद पडल्याने परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

सिडको : येथील प्रभाग क्र मांक २५ मधील कामटवाडेरोड ते दुर्गानगर या परिसरातील एलईडी दिवे गेल्या सोमवारी (दि.९) मध्यरात्री अचानक बंद पडल्याने परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मनपाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच लावण्यात आलेले एलईडी हे एकाच वेळी बंद पडल्याने याबाबत प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी विद्युत विभागाचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार तसेच मक्तेदाराच्या गलथानपणाबाबत नाराजी व्यक्त करीत मनपा आयुक्तांना पत्र दिले होते. यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांना जाग आली व आज सकाळपासून परिसरातील सर्व एलईडी दिवे सुरू करण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले.  सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील कामटवाडेरोड, सायखेडकर हॉस्पिटल व दुर्गानगर येथे सोमवारी मध्यरात्री एलईडी दिवे काही तांत्रिक कारणामुळे अचानक बंद पडले तर काही पथदीपांचा स्फोट झाला. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. याबाबतची माहिती रात्री युवासेनेचे पदाधिकारी पवन मटाले यांनी मनपाच्या विद्युत विभागाला दिली असता कर्मचाºयांकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे मटाले यांनी सांगितले. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपा अ‍ॅपवरदेखील तक्रार नोंदविली. या घटनेमुळे मनपा विरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे.बडगुजर यांनी मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत काही दिवसांपूर्वीच लावण्यात आलेले एलईडी खराब कसे झाले, याबाबत मनपा आयुक्तांना पत्र देत चौकशीची मागणी केली. या पत्रामुळे मनपा अधिकारी व कर्मचारी कामाला लागले. बुधवारी सकाळपासून बंद पथदीपांचा आढावा घेत कामटवाडे शिवार, सायखेडकर हॉस्पिटल परिसर, त्रिमूर्ती चौक, दुर्गानगर या भागातील बंद झालेले एलईडीचे दिवे दुरुस्त करण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका