शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर पडक्या वाड्यांच्या पुनर्वसनासाठी हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:56 IST

शहरातील वाडे एकेक करीत धारातीर्थी पडत असून, महापालिकेची रखडलेली क्लस्टर म्हणजेच गावठाण पुनर्विकासाची योजना कधी लागू होणार याविषयी प्रश्न केले जात आहे. अखेरीस महापालिकेने आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी शनिवारी (दि.३) निविदा मागवल्या असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर क्लस्टर योजना लागू होणार आहे.

ठळक मुद्देमनपाने काढली निविदा ; आघात मूल्यमापनानंतर क्लस्टर होणार

नाशिक : शहरातील वाडे एकेक करीत धारातीर्थी पडत असून, महापालिकेची रखडलेली क्लस्टर म्हणजेच गावठाण पुनर्विकासाची योजना कधी लागू होणार याविषयी प्रश्न केले जात आहे. अखेरीस महापालिकेने आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी शनिवारी (दि.३) निविदा मागवल्या असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर क्लस्टर योजना लागू होणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरदेखील मंजुरीला किती वेळ लागेल असे सांगता येत नसले तरी वर्षाखेरीस ही योजना मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.२३ गावठाण क्षेत्र करून एकत्र करण्यात आलेले ही महापालिका आहे. गावठाण किंवा गाभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जुनी घरे किंवा वाडे आहेत. मात्र, अनेक पिढ्यांचा हा वारसा आता कमी होऊ लागला आहे. शंभर ते दीडशे-दोनशे वर्षांचे अनेक वाडे आता तग धरू शकत नाही. जे वाडे तग धरत नाही ते पडण्यास आले आहेत. अनेक मालकांनी वाडे सोडले आहेत, परंतु वाड्यातील अल्प भाडे अन्यत्र असलेले दर यामुळे भाडेकरू सोडण्यास तयार नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून गावठाण पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. यंदा सरकारने क्लस्टर योजना राबवण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यानुसार एक हजार चौरस मीटर क्षेत्रातील वाडे एकत्र करून वाड्यांची इमारत करण्यात येणार असून, चार एफएसआय देण्यात येणार आहे. सदरचा प्रस्ताव अमलात आणण्यापूर्वी गावठाणात एकाच ठिकाणी इतकी घनता वाढल्यानंतर त्याचा मनपाच्या मूलभूत सुविधांवर काय परिणाम होऊ शकेल यासाठी आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचे आदेश शासनाने महापालिकेला दिले होते. वर्षभर त्यात कालहरण झाल्यानंतर महापालिकेने अखेरीस शनिवारी (दि.३) निविदा मागवल्या आहेत. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार