पाळे खुर्द : येथील विजय बाजीराव पाटील यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घराकडे परतत असताना खामखेडा गावाजवळ अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली.विजय पाटील नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना अर्धांगवायूचा त्रास झाला. रुग्णालयातील उपचारानंतर परतत असताना त्यांना जीपगाडीने धडक दिली. परिसरातील नागरिकांनी त्यांना सटाणा येथे दवाखान्यात नेले. अधिक उपचारासाठी त्यांना मालेगाव रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ते वसाका कारखान्यात गट कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. (वार्ताहर)परतू वसाका सद्यस्थितीत बंद असल्याने शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
...अखेर मृत्यूने त्यांना गाठलेच
By admin | Updated: February 11, 2015 23:50 IST