शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

अखेर वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती प्रतीक्षा संपली : पदव्युत्तर अभ्यासक्रमालाही मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:57 IST

नाशिक: राज्याच्या आरोग्य शिक्षणाची जबाबदारी सांभाळणारे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकस्थित असतानाही, नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने याबाबतची खंत वारंवार व्यक्त केली जात होती.

नाशिक: राज्याच्या आरोग्य शिक्षणाची जबाबदारी सांभाळणारे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकस्थित असतानाही, नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने याबाबतची खंत वारंवार व्यक्त केली जात होती. अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच त्याच्याशी संलग्न ४३० खाटांचे रुग्णालयास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे.नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ आल्यानंतर, प्रत्यक्षात विद्यापीठ स्थिरस्थावर होण्यास सुरुवातीची काही वर्षे गेली. त्यानंतर नाशिकमध्येही वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी चर्चा सुरू झाली आणि विद्यापीठांचे आजवरचे कुलगुरू, तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री, पालकमंत्र्यांनी यासाठीची पावले उचलली, परंतु नाशिकला महाविद्यालय होण्याची प्रक्रिया अनेकविध कारणांने मागे पडत गेली. नाशिकमध्ये डॉ. डी. एस. आहेर यांच्याकडे आरोग्यमंत्री पद असताना आयएमएसारख्या संस्थेनेही यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता. परंतु पुढे त्याला मूर्त स्वरूप लाभू शकले नाही.दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून याबाबतच्या प्रयत्नांना आणखी गती देण्यात आली. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित, जितेंद्र आव्हाड, गिरीश महाजन यांनी या विषयाला काही प्रमाणात चालना दिल्याने प्रकरण पुढे सरकले. अर्थात, त्यानंतरही नाशिकचा विषय मागे पडून नंदुरबार आणि जळगावमधील वैद्यकीय महाविद्यालय आकारास आले. त्यामुळे नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू होती. नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय दृष्टिपथात येत नसल्याने, निदान पदव्युत्तर महाविद्यालयाबाबतची चर्चा सुरू झाली आणि संदर्भ सेवा रुग्णालयाला संलग्न पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या जागा देण्याचे प्रयत्न सुरू झाले.जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याचे संकेत अनेकदा दिले होते. भुजबळ यांनी याबाबतची मागणी सातत्याने केली आणि अखेर बुधवारी (दि.१०) नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.--इन्फो--विद्यापीठ आवारातच महाविद्यालय शक्यनाशिकला वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यासाठी ६२७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विद्यापीठाची ५५ एकर जागा असून, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी २० एकर जागेचा निकष आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारातच महाविद्यालय सुरू होऊ शकते.....आरोग्य विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराचा फोटो वापरावा.

टॅग्स :Medicalवैद्यकीय