शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर हिरे - गायकवाड यांचे मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 23:08 IST

मालेगाव : गेल्या अनेक दिवसांपासून मतभेदांमुळे भाजपापासून दूर गेलेले युवा नेते अद्वय हिरे आणि भाजपा गटनेते सुनील गायकवाड यांचे मनोमिलन झाले असून, आगामी सर्वच निवडणुका एकदिलाने लढविण्याचा मनोदय दोघांनीही जाहीर केला.

ठळक मुद्देनिवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय; सेनेपुढे आव्हान

मालेगाव : गेल्या अनेक दिवसांपासून मतभेदांमुळे भाजपापासून दूर गेलेले युवा नेते अद्वय हिरे आणि भाजपा गटनेते सुनील गायकवाड यांचे मनोमिलन झाले असून, आगामी सर्वच निवडणुका एकदिलाने लढविण्याचा मनोदय दोघांनीही जाहीर केला.ओबीसी आघाडीचे दीपक पवार यांच्या मध्यस्थीचे जळगाव येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात सुनील गायकवाड आणि अद्वय हिरे यांना समोरासमोर बसवून त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात आले. गेल्या निवडणुकीपासून अद्वय हिरे भाजपापासून काही काळ दूर होते. आता त्यांनी भाजप ह्यपक्षह्ण सोडलेला नव्हता. आता त्यांनी सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित मालेगाव जिल्ह्यातील भाजपाची धुरा अद्वय हिरे सांभाळतील. निवडणुकांची जबाबदारीही त्यांच्यावरच टाकण्यात आली.आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व निवडणुका अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील. हिरे सक्रिय झाल्यामुळे पक्ष बळकट होणार असून, तालुक्यातील राजकारणात शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे ठाकणार आहे. मनपा, बाजार समिती, पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात असून, कृषिमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व आहे. मात्र, गायकवाड - हिरे एकत्र आल्याने भाजपातील मरगळ झटकली जाणार आहे. त्यांच्या सक्रियतेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. तालुक्यातील एकहाती सत्तेला ह्यआव्हानह्ण मिळणार आहे. बैठकीस माजी मंत्री गिरीश महाजन, दीपक पवार, आमदार जयकुमार रावल उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliticsराजकारण