शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अखेरीस करवाढ रद्दचा निर्णय आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:44 IST

महापालिका प्रशासनाने केलेली करवाढ रद्द करण्याचा ठराव महापौरांनी आयुक्तांकडे रवाना केला असून, आता आयुक्त त्यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

नाशिक : महापालिका प्रशासनाने केलेली करवाढ रद्द करण्याचा ठराव महापौरांनी आयुक्तांकडे रवाना केला असून, आता आयुक्त त्यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार वार्षिक भाडेमूल्य जाहीर केले असून, मोकळ्या भूखंडावर करआकारणी करण्यात आल्याने त्याविषयी शहरात नाराजीचा सूर उमटत आहे. त्यासंदर्भात मोेर्चे आणि मेळावे निघाल्यानंतर करवाढीच्या विरोधात विशेष महासभा घेण्यात आली; परंतु त्यावेळी विधान परिषदेची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने त्यासंदर्भात निर्णय स्थगित ठेवण्यात आला होता; परंतु विधान परिषदेचे निकाल संपल्यानंतर गेल्या १९ जुलै रोजी महापालिकेची विशेष तहकूब सभा घेण्यात आली. यावेळी सुमारे सात तास चाललेल्या चर्चेत १०५ नगरसेवकांनी करवाढीला विरोध केला होता. त्या अनुषंगाने आयुक्तांनी करवाढीच्या विरोधात निर्गमित केलेले आदेश रद्द करण्याचा ठराव केला. महापालिकेत करवाढ करण्याचे अधिकार हे स्थायी समितीला असतात. आयुक्तांनी परस्पर काढलेले आदेश बेकायदेशीर असून, त्या अनुषंगाने हे ठराव रद्द करण्यात येत असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. सदरचा ठराव बुधवारी (दि.२४) तयार करण्यात आल्यानंतर तो महापौरांनी आपल्या स्वाक्षरीनिशी नगरसचिवांमार्फत आयुक्तांकडे रवाना केला. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांना महासभेत त्यांची बाजू मांडता आली नसल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आपले आदेश बेकायदेशीर असल्याचा ठराव बेकायदेशीर आहेत, असा दावा केला होता. त्याचप्रमाणे ठरावातील काही बाबींची योग्य दखल घेऊ, असाही दावा केला होता. त्यावर आता ते काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका