सिडको : महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाच्या वतीने आजपासून पावसाळी नाले व गटारी साफसफाईच्या कामास प्रारंभ करण्यात आला. दरवर्षी पावसाळा सुरूहोण्यापूर्वी उघडे नाले व गटारी साफसफाई करण्याची मोहीम मनपाच्या सिडको बांधकाम विभागाच्या वतीने राबविण्यात येते. यंदाच्या वर्षीही सिडकोतील दत्त चौक येथील उघडा नाला साफसफाई करून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. खरेतर पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात येऊन उघडे नाले हे नियमित साफ होणे गरजेचे असते. उघड्या नाल्यांमध्ये परिसरात नागरिक घाण व कचरा टाकतात. यामुळे दुर्गंधी पसरते. यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच उघडे नाले व गटारी साफ करण्यास प्रारंभ झाला. शहर उपअभियंता सुनील खुने, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, उपअभियंता प्रकाश पठाडे यांच्या नेतृत्वाखाली सदरची मोहीम सुरूकरण्यात आली आहे. आज मोहीम शुभारंभाप्रसंगी नगरसेवक राजेंद्र महाले उपस्थित होते. (वार्ताहर)
...अखेर सिडकोत नालेसफाई सुरू
By admin | Updated: June 7, 2014 01:48 IST