शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबा महाराज यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 22:59 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ग्रामदैवत खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव बुधवारपासून (दि. ११) सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

ठळक मुद्देपरंपरा : बुधवारपासून प्रारंभ; आवर्तनानुसार यंदा मान पाथरे बुद्रुकला

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ग्रामदैवत खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव बुधवारपासून (दि. ११) सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.दत्त जयंतीपासून सुरू होणारा हा यात्रोत्सव आठवडाभर चालतो. आवर्तन पद्धतीने साजरा होणारा हा यात्रोत्सव साजरा करण्याचा मान पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव या गावांना मिळतो. यावर्षी हा मान पाथरे बुद्रुककरांना मिळाला आहे.खंडोबा महाराज मंदिर, दत्त मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. येथील मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी बुधवारी रात्री आठ वाजता गावातून छबिण्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे. गावातील बुरूजाच्या वाड्यासमोर धनगर बांधवांच्या वतीने रथाची मिरवणूक काढून डफांच्या तालावर नृत्य केले जाते.यावेळी खंडोबा महाराजांच्या पादुका आणि मुकुट, तकतराव म्हणजेच देवाचा गाडा यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. गुरुवारी सकाळी खंडोबा महाराज पादुका पालखी सोहळा, तकतराव व कावड मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक कावडधारकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. शनिवारी कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात्रेसाठी ग्रामस्थांनी दिली देणगीयात्रा नियोजनासाठी नुकतीच ग्रामस्थांची बैठक पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी अरुण नरोडे, उपाध्यक्ष बाळासाहेब चिने, सरपंच शरद नरोडे, उपसरपंच सविता थोरात व इतर सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रत्येक कुटुंबाकडून ४०० रुपये वर्गणी घेण्याचे ठरले. यात्रा काळात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित ठेवण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष नरोडे यांच्यासह वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे.

टॅग्स :Khandoba Yatraखंडोबा यात्राTempleमंदिर