शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मुलांनी बनविलेल्या वस्तू घेतल्या सिनेतारकांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 14:10 IST

या विद्यार्थ्यांना वस्तू निर्मितीच्या आनंदासह मोबदला मिळाल्याने आपणदेखील कांहीतरी कमाऊ शकतो ही भावना त्यांच्यात निर्माण होते.

- अशोक बिदरीमनमाड ( नाशिक ) : निगराणी प्रशाळेतील गतीमंद, मतिमंद, मुकबधीर, सेलेब्रल पाल्सी आदी विविध बहुविकलांग प्रकारातील दिव्यांग मुलांना व्यावसायिकदृष्ट्या त्यांच्या पायावर ऊभे करण्यासाठी छोटे-मोठे उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून कांही वस्तुंची निर्मिती करण्यात येते.

अशा वस्तू समाजातील कांही दानशूर व्यक्ती मोबदला देऊन विकत घेतात. हा मोबदला या दिव्यांग मुलांना त्यांच्या निर्मिती योगदानानुसार वाटप करण्यात येतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वस्तू निर्मितीच्या आनंदासह मोबदला मिळाल्याने आपणदेखील कांहीतरी कमाऊ शकतो ही भावना त्यांच्यात निर्माण होते. परिणामी या दिव्यांग मुलांच्या पालकांना त्यांची मुले ओझं न वाटता ते त्यांचा आनंदाने स्विकारतात.अशाच उपक्रमाचा एक भाग म्हणून दिवाळीच्या सणासाठी विविध नक्षीदार मातीच्या पणत्या आकर्षक रंगाने रंगविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन पणत्यांची निर्मिती करण्यात येत आहे.

या पणत्या हिंदी स्टार वाहिनीवरील अनुपमा या मालिकेतील बा ही व्यक्तीरेखा साकारणार्‍या मुंबईतील अभिनेत्री अल्पना भुच यांच्या निदर्शनास आल्या. त्यांना या पणत्या खुप आवडल्याने त्यांनी १५० पणत्यांची तात्काळ ऑर्डर दिली व त्यायोगे या दिव्यांग मुलांनी निर्माण केलेल्या वस्तू विकत घेऊन एकप्रकारे सामाजिक दायित्व निभावले. मुंबईच्या चंदेरी दुनियेत या पणत्यांची महती गेल्याने या दिव्यांग मुलांच्या वस्तू जास्तीत-जास्त विकत घेतल्या जातील.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022