शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कांदा साठवणुकीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:58 IST

परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून गारपीट, अवकाळी पाऊस व यावर्षी दुष्काळाचे दुष्टचक्र मागे लागलेले असताना या सर्व संकटावर मात करून कांदा पिकविला. हाच कांदा आता बाजारात पाचशे ते आठशे रुपयांनी विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असून, बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.

खामखेडा : येथील परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून गारपीट, अवकाळी पाऊस व यावर्षी दुष्काळाचे दुष्टचक्र मागे लागलेले असताना या सर्व संकटावर मात करून कांदा पिकविला. हाच कांदा आता बाजारात पाचशे ते आठशे रुपयांनी विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असून, बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.गेल्या वर्षी उन्हाळ कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन झाल्याने कांदा काढणीच्या वेळेस आज ज्या भावात कांदा विकला जात आहे, त्याच भावात गेल्या वर्षी विकला जात होता, तेव्हा पुढे भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्याने चाळीत कांदा साठवणूक केली होती; परंतु पूर्ण वर्षभर कांद्याच्या भावात वाढ झाली नाही. कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेवर नोव्हेंबर महिन्यापर्यंत ठेवला; परंतु भाव वाढला नाही. तेव्हा कांदा चाळीत सडला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. हा कांदा चाळीतून काढून उकिरड्यावर फेकावा लागला. तरीही या वर्षी मोठ्या हिमतीने शेतकºयाने कांद्याची लागवड केली आहे. या कांदा पिकासाठीउधार, उसनवार पैसे आणून उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे; परंतु पाहिजे तसा भाव नसल्याने तो चाळीत ठेवत आहे.यावर्षी चांगल्या वातावरणामुळे अल्पसा पाऊस असूनही शेतकरी वर्गाला कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर साधले आहे; मात्र उत्पादन खर्च हजार रुपये एकरी असताना कांद्याला मिळत असलेल्या सरासरी पाचशे ते आठशे रु पये बाजारभावामुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीस जोर देऊ लागला आहे.मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा शेतकरी साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या खामखेडा परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.गिरणा परिसरातील खामखेड, भऊर, बगडू, पिळकोस, बेज, भादवण, विसापूर या परिसरामध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी अल्पशा पावसावर लागवड केलेल्या कांद्यास अल्प बाजारभाव मिळत असल्याने शेतकरीवर्गाने कांदा साठवणुकीवर भर दिला आहे.यावर्षी कांदा पिकास पोषक वातावरण असल्याने साठवणुकीच्या क्षमतेपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याने तसेच सध्या कांद्यास सरासरी चारशे ते सातशे रु पयापर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देऊ लागलाआहे.अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी कायमस्वरूपी केलेल्या सोयी कांदा चाळी भरून गेल्याने खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी परिसरात तात्पुरते कुड व अन्य सोयी उभारून कांदा साठविण्याची तयारी करीत आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा