शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह प्रेयसीविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 01:04 IST

पती व प्रेयसीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने लग्नाला सहा महिने पूर्ण होण्याच्या आतच आत्महत्या केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी वणी पोलिसात मंगळवारी (दि. १२)पती व प्रेयसीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला ताब्यात घेतले आहे.

वणी : पती व प्रेयसीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने लग्नाला सहा महिने पूर्ण होण्याच्या आतच आत्महत्या केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी वणी पोलिसात मंगळवारी (दि. १२)पती व प्रेयसीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला ताब्यात घेतले आहे.दिंडोरी तालूक्यातील हस्ते दुमाला येथील बबनराव महाले यांनी मुलीच्या मृत्यूनंतर तिसºया दिवशी वणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, माझी अभियांत्रिकीची पदवीधर असलेली मुलगी पूजा महाले हिचा विवाह येवला येथील शेखर संजय शिंदे याच्याशी दि. १७ मे २०१९ रोजी झाला होता.विवाहानंतर शेखर एका मुलीशी फोनवर वारंवार बोलत असल्याची बाब पुजाच्या निदर्शनास आली होती. याबाबत तिने शेखरला जाब विचारला असता त्याच्या वर्तनात काहीहीफरक पडला नाही. यासंदर्भात शेखरची आई व बहिणीस सांगितले असता त्यांनी शेखरची कानउघाडणी केली होती.सहनशीलतेचा अंत झाल्याने पूजाने दि. ६ नोव्हेंबर रोजी पहाटे विषारी औषध सेवन केले. ही बाब कुटुंबीयांंच्या क्षात आल्यावर त्यांनी पुजाला वणीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दि. ८ रोजी तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला नाशिक येथे हलविले, मात्र उपचार सुरु असताना दि. ९ रोजी मध्यरात्री तिची प्राणजोत मालविली. पती व प्रेयसीने मानसिक खच्चीकरण केल्यानेच मुलीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.मानसिक खच्चीकरण केलेकाही दिवसानंतर रक्षाबंधनासाठी पुजा माहेरी आल्यावर तिची प्रकृती व्यवस्थित नव्हती. याबाबत तिच्या कुटुंबियांनी विचारपूस केली होती. तदनंतर भाऊबीजेसाठी माहेरी आली तेव्हाही पुजा चिंतेत असल्याची बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आली होती. काही दिवसानंतर पुजा माहेरी असताना पती शेखर तसेच प्रेयसी भाग्यश्री भावसार भ्रमणध्वनीवरु न तिच्याशी संपर्क साधून सहा महिन्यात शेखर तुला फारकत देणार असून तू येवला येथे येऊ नको अशा शब्दात मानसिक खच्चीकरण केले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस