शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

नाशिक तहसीलमधून फाईल गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:49 IST

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्टÑ पोलीस अकादमीसमोरील सुमारे ६० एकर जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराची कागदपत्रे नाशिक तहसीलदार कार्यालयातून गहाळ झाल्याची बाब उघडकीस आली असून, यासंदर्भात जागामालकाने राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे अपील दाखल केले असता, तत्काळ कागदपत्रे देण्याचे आदेश देऊनही तहसील कार्यालयाने त्याची अंमलबजावणी न केल्याने याबाबत आता थेट राज्याच्या मुख्य माहिती आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देजागामालकाने राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे अपील दाखलराज्याच्या मुख्य माहिती आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला

शोधूनही सापडेना : माहिती आयोगाच्या आदेशाला हरताळ; माहिती अधिकारात अनेक धक्कादायक बाबी उघड

 

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्टÑ पोलीस अकादमीसमोरील सुमारे ६० एकर जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराची कागदपत्रे नाशिक तहसीलदार कार्यालयातून गहाळ झाल्याची बाब उघडकीस आली असून, यासंदर्भात जागामालकाने राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे अपील दाखल केले असता, तत्काळ कागदपत्रे देण्याचे आदेश देऊनही तहसील कार्यालयाने त्याची अंमलबजावणी न केल्याने याबाबत आता थेट राज्याच्या मुख्य माहिती आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्टÑ पोलीस अकादमी समोरील सर्व्हे नंबर ७५०, ७५१ व ७५५ या सुमारे ६० एकर जमिनींबाबत चाललेल्या टेनन्सी सरेंडरच्या टेनन्सी केस नंबर ८/२००३ व १०/२००३ या केसेसच्या निकाली फाईली तसेच सर्व्हे नंबर ७५५ ची कब्जा पावतीच्या सर्टिफाईड नकला मिळाव्यात यासाठी सदर जमिनीचे पूर्वगामी कुळ दिगंबर त्रिलोकचंद अहिरवार यांनी माहिती कायद्याच्या अधिकारात जनमाहिती अधिकारी तथा कूळ कायदा अव्वल कारकून, तहसील कार्यालय यांच्याकडे सदर केसच्या निर्णयाच्या, जाबजबाबाच्या व कब्जे पावतीच्या नकला मिळणेसाठी दोन अर्ज केले होते.तथापि, सदर केसची फाईल रेकॉर्ड रूममध्ये आढळून येत नाही, असे तहसील कार्यालयातून दिगंबर अहिरवार यांना कळविण्यात आले होते. त्या विरुद्ध अहिरवार यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे अपील करूनही सदर कागदपत्रांचा शोध लागू शकला नाही म्हणून अहिरवार यांनी राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे द्वितीय अपील दाखल करण्यात आले होते. पहिल्या अपिलात खंडपीठात विद्यमान प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार यांनी निर्णय मिळाल्यापासून १५ दिवसांच्या मुदतीत अर्जाच्या अनुषंगाने त्यांनी मागितलेल्या माहिती संदर्भात कार्यालयातील अभिलेखात कसून शोध घ्यावा व त्यानंतर कार्यालयातील उपलब्ध असलेली माहिती नोंदणीकृत पोच डाकने विनामूल्य पुरवावी, असा आदेश दिला होता. त्यावर अहिरवार यांनी दुसरे अपील दाखल केले होते. त्यात सर्व्हे नंबर ७५५ ची कब्जा पावती झालेली नसतानाही सातबारा उताऱ्यावर कब्जा दिल्याचे व कब्जा पावती झाल्याचा शेरा नाशिक तलाठ्याने मारल्याची नोंद असल्याने या कब्जा पावतीची सर्टिफाईड नक्कल कोर्ट कामासाठी मिळावी यासाठी माहिती मागविली होती. त्यावरही खंडपीठाने तहसीलदारांना निर्णय मिळाल्यापासून १५ दिवसांच्या मुदतीत विद्यमान जन माहिती अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार, जनमाहिती अधिकारी तथा कुळ कायदा अव्वल कारकून व मंडळ अधिकाºयांचे पथक गठित करून अपीलकर्त्याने मागितलेल्या माहितीचा तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात शोध घ्यावा आणि उपलब्ध माहिती, वस्तुस्थिती निदर्शक उत्तर अपीलकर्त्यास पुढील १५ दिवसांच्या आत नोंदणीकृत पोचने द्यावे.सदर माहितीचा अढळ न झाल्यास अपिलीय अधिकाºयाने तसे शपथपत्र आयोगास सादर करावे. माहिती खंडपीठाने ७ मार्च २०१८ रोजी सदरचे आदेश दिले आहेत. आयोगाने आदेश देऊन आता दीड महिन्याचा कालावधी उलटला असून, तहसीलदार कार्यालयाने अद्यापही त्याची पूर्तता केलेली नाही. एकप्रकारे आयोगाच्या आदेशाला हरताळच फासला गेला असून, नाशिक शहराच्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी व कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या या जमिनीचे टेनन्सी केसेसचे दप्तर हेतूत: गहाळ करण्यात आल्याचा संशय कुळ दिगंबर अहिरवार यांनी व्यक्त केला आहे.