मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकातील रेल्वे कॅन्टीनच्या कारणावरून कुरापत काढून शहरातील हॉटेल राधिकासमोर शनिवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे.मनमाड रेल्वे स्थानक जंक्शन असल्याने, स्थानकांमध्ये प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. यामुळे स्थानकात व्यवसाय करण्यासाठी चढाओढ नेहमीच व्यावसायिकांमध्ये बघण्यास मिळते. मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात व्यवसाय करण्यावरून नेहमीच चर्चेत राहिले आहे.या प्रकरणी इरफान युसूफ शेख (३४, रा.मनमाड) याने मनमाड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. इरफान शेख यांची मनमाड रेल्वे स्थानकावर आहे. त्यांच्यात नेहमीच कॅन्टीनच्या कारणावरून वाद होत असतात. शनिवारी रात्रीच्या सुमारास शहरातील हॉटेल राधिका बीयर बार येथे असताना, अनिस रहिम शेख, आसिफ रहिम शेख, फारूक रहिम शेख, आरीफ रहिम शेख (सर्व राहणार भारतनगर रोड, वडारवाडी शेजारी मनमाड) यांनी बीयर बारच्या बाहेर बोलावून रेल्वे कॅन्टीनच्या भांडणाच्या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ दमदाटी केली व लाकडी दांडा, लोखंडी रॉडने इरफान शेख यांच्या तोंडावर, डोक्यावर व हाता-पायावर मारहाण करून, जिवे मारण्यात प्रयत्न केला, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सध्या इरफान शेख नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गीते करीत आहेत.
रेल्वे स्थानकातील कॅन्टीनच्या वादावरून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 00:40 IST
मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकातील रेल्वे कॅन्टीनच्या कारणावरून कुरापत काढून शहरातील हॉटेल राधिकासमोर शनिवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे.
रेल्वे स्थानकातील कॅन्टीनच्या वादावरून हाणामारी
ठळक मुद्देमनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात व्यवसाय करण्यावरून नेहमीच चर्चेत