शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या प्रश्नांसाठी लढा उभारावा लागेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:22 IST

स्थानिकांना स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या व अशा अनेक मागण्यांसाठी शासनाकडून गरिबांचे व आदिवासींचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल, असे आवाहन रविवारी हरसूल येथील आयोजित किसान सभेच्या जाहीर सभेत माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी केले.

ठळक मुद्देजे. पी. गावित : हरसूल किसान सभेच्या वतीने सभा

त्र्यंबकेश्वर : जंगल, जमिनी आदिवासींच्या असून, सरकार वनदावे देताना अवास्तव कागदपत्रांची मागणी करून गरिबांची हेळसांड करीत आहे. आदिवासींच्या शिक्षणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत आहे. घरकुलांचे बांधकाम झालेले असताना घरकुल हप्ते मिळत नाहीत. स्थानिकांना स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या व अशा अनेक मागण्यांसाठी शासनाकडून गरिबांचे व आदिवासींचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल, असे आवाहन रविवारी हरसूल येथील आयोजित किसान सभेच्या जाहीर सभेत माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी केले. सभेचे आयोजन किसान सभेचे सेक्रेटरी इरफान शेख यांनी केले होते.गावित यांनी सांगितले की, सरकारला भरणाऱ्या कराच्या तुलनेत गरिबांना सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. दिवसेंदिवस महागाई वाढत असून, शासन महागाई रोखण्यात कमी पडत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किमती खूप वाढत आहे. गरिबांना आपल्या रोजगार व हक्कांसाठी मोठा लढा उभा करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.हरसूल येथील आयोजित सभेत शेतकरी व आदिवासींच्या विविध प्रश्नांवर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आदिवासींचा निधी आदिवासींसाठी पूर्णपणे वापरला पाहिजे. आदिवासींचे वनदावे मंजूर केले पाहिजे, असे मत किसान सभेचे सेक्रेटरी इरफान शेख यांनी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर सभेच्या अध्यक्षस्थानी रमेश बरफ (जि. प. सदस्य, ठाणापाडा गट) यांच्या समवेत सावळीराम पवार, इरफान शेख, सभापती ज्योती राऊत, देवराम मौळे, जावेद जहागीरदार, शाफिक शेख, नामदेव मोहोंडकर, महेश टोपले आदींसह अनेक मान्यवर वशेकडो किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJ.P. Gavitजे.पी. गावित